HomeनांदेडThe Well Of Kankeshwar Lack ; वाढोणा येथील श्री कनकेश्वर तलावातील विहिरीने...

The Well Of Kankeshwar Lack ; वाढोणा येथील श्री कनकेश्वर तलावातील विहिरीने गाठला तळ

हिमायतनगर,अनिल मादसवार। शहरापासून हाकेच्या अंतरावर इच्छापूर्ती श्री वरद विनायक मंदिर असून, या मंदिरानजीक असलेल्या श्री कनकेश्वर तलावात खोल विहिर आहे. या तलावाचे पाणी दिवाळीच्या काळात आटले असून, यातील विहिरीचे पाणी 1985 च्या काळात उद्भवलेल्या पाणी टंचाई निवारण्यासाठी फायदेशीर ठरले होते. त्यावेळी याच विहितील पाण्याने गावकऱ्यांची तहान भागली होती असे जुने जाणकार सांगतात.

तीच विहीर आज घडीला तळाला गेली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील पाण्याची पातळी किती खोलवर गेली असेल याचा अंदाज लावणे कठीण बनले आहे. आजघडीला हिमायतनगर शहरातील शेकडो बोअर, सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्या असून, त्यामुळे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.

IMG 20250513 054052 The Well Of Kankeshwar Lack ; वाढोणा येथील श्री कनकेश्वर तलावातील विहिरीने गाठला तळ

सध्या शहरातील 500 फूट खोल बोअरवेलला थोडेसे पाणी असून, में महिन्यात कमी होत चालले आहे. अश्या परिस्थितीत 1985 साली हिमायतनगर (वाढोणा) शहराची तहान भागविणारी कनकेश्वर तलावातील विहीर देखील तळाला गेल्याने पाणी टंचाईची भीषणता वाढली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments