HomeनांदेडChhatrapati Sambhaji Maharaj ; छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जन्मोत्सव याकरिता शंभुप्रेमी निघाले...

Chhatrapati Sambhaji Maharaj ; छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जन्मोत्सव याकरिता शंभुप्रेमी निघाले दिल्लीकडे….!

नांदेड। विश्वातील सर्वोत्तम राजपुत्र युवराज छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती देशाची राजधानी दिल्ली येथे छावा मराठा संघटना व अखिल भारतीय छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती आणि सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहकार्याने 14 मे 2025 रोजी साजरी होत आहे.

या जयंती महोत्सवाला नांदेड जिल्ह्यातील छावा मराठा संघटनेचे पदाधिकारी आणि शंभूप्रेमी रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यामध्ये इंजि. राष्ट्रीय स्तरावर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरा करण्यात येणारे यावर्षी तिसरे वर्ष आहे. यासाठी इंजि.तानाजी हुस्सेकर, डॉ.अशोक कदम, डॉ. अविनाश पुयड,डॉ. प्रभाकर जाधव, प्रा. सुधाकर कौशल्य, इंजि. प्रवीण जाधव, अजय मुंगल, प्रवीण पाटील,सतीश पवार, खुशाल जाधव,श्याम जाधव, दीपक राजूरकर शिवेंद्र राजूरकर, शिवानंद पाटील, गोपीराज हंबर्डे, प्रमोद देशमुख यसह बहुसंख्य शंभूप्रेमी दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

त्यांना ढोल ताशाच्या गजरात निरोप देण्यासाठी अशीष चौधरी, प्रकाश गिरे पाटील, संदीप कऱ्हाळे, नागेश कल्याणकर,दीपक पावडे, सतीश देशमुख, विजय जाधव, पंडित पवळे, संजय हंबर्डे, श्रीकांत मगर, श्रीराम चक्रवार, केदार उपाध्याय, महेश ठाकूर, शुभम धनजकर गोपीनाथ हुस्सेकर प्रा. अर्जुन सूर्यवंशी, श्रवण हुस्सेकर, पंडित पवळे, गणेश वडजे, शिवाजी पाटील, विजय जाधव सुरेश इंगळे, भास्कर थेटे, श्रीहरी गुरुजी कौशल्ये, प्रथमेश कदम,कृष्णा जाधव जिजाऊ ब्रिगेडच्या महिला उपाध्यक्ष रेणुका कौशल्य, सविता जाधव, सौ.सदिच्छा पाटील सोनी यांच्यासह अनेक महिला व पुरुष शिवप्रेमी यांनी सर्वांचे उत्साहात ढोल ताशाच्या गजरात स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वागत व शुभेच्छा …! दिल्ली येथे सलग तिसऱ्या वर्षी छत्रपती संभाजीराजेंची जयंती साजरी होणार आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे १४ मे २०२५ ला शंभुराजेंची जयंती होईल. हा कार्यक्रम अखिल भारतीय छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती २०२५ च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

यासाठी नांदेड येथून शिवप्रेमी इंजि.तानाजी हुसेकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा जत्था आज सकाळी सचखंड एक्सप्रेसने दिल्लीकडे रवाना झाला यावेळी या सर्वांचे स्वागत सामाजिक कार्यकर्त्यां सौ.सदिच्छा सोनी पाटील यांच्या वतीने करण्यात आले यावेळी सर्व यात्रेकरूंना पुष्पहार अर्पण करत अल्पहाराचे साहित्य सौ पाटील यांच्या महीला मंडळाच्या वतीने प्रदान करण्यात आले व सर्व शिवप्रेमींना यावेळी दिल्लीकडील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या ..!

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments