Chhatrapati Sambhaji Maharaj ; छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जन्मोत्सव याकरिता शंभुप्रेमी निघाले दिल्लीकडे….!
नांदेड। विश्वातील सर्वोत्तम राजपुत्र युवराज छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती देशाची राजधानी दिल्ली येथे छावा मराठा संघटना व अखिल भारतीय छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती आणि सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहकार्याने 14 मे 2025 रोजी साजरी होत आहे.
या जयंती महोत्सवाला नांदेड जिल्ह्यातील छावा मराठा संघटनेचे पदाधिकारी आणि शंभूप्रेमी रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यामध्ये इंजि. राष्ट्रीय स्तरावर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरा करण्यात येणारे यावर्षी तिसरे वर्ष आहे. यासाठी इंजि.तानाजी हुस्सेकर, डॉ.अशोक कदम, डॉ. अविनाश पुयड,डॉ. प्रभाकर जाधव, प्रा. सुधाकर कौशल्य, इंजि. प्रवीण जाधव, अजय मुंगल, प्रवीण पाटील,सतीश पवार, खुशाल जाधव,श्याम जाधव, दीपक राजूरकर शिवेंद्र राजूरकर, शिवानंद पाटील, गोपीराज हंबर्डे, प्रमोद देशमुख यसह ब...
