HomeनांदेडNanded ; डंकीन दर्गा येथे नांदेडात ९ मे रोजी सैलानी बाबांचा संदल

Nanded ; डंकीन दर्गा येथे नांदेडात ९ मे रोजी सैलानी बाबांचा संदल

नांदेड | हजरत हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबांचा संदल येत्या दि.०९ मे (शुक्रवारी) सायंकाळी ५ वाजता गंगाचाळ डंकीन समोर असलेल्या दर्गा येथे होणार असल्याची माहिती येथील मुख्य पुजारी रघुबाबा यांनी दिली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील गंगाचाळ डंकीन भागात असलेल्या सैलानी बाबांच्या दर्गा येथुन संदल मिरवणूक काढण्यात येते.

यावर्षीही येत्या दि.०९ मे (शुक्रवारी) सायंकाळी ५ वाजता गोदावरीच्या घाटावरुन या संदल मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक भीमघाट, देगावचाळ, पक्कीचाळ पोलीस चौकी ते गंगाचाळ पासून डंकीन समोरील सैलानी बाबांच्या दर्गा येथे पोहचेल.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती गणपत धबाले, पप्पु (प्रदीप) जाधव, विलास धबाले, विश्वनाथ घडलिंगे, शुभम ठाकूर, शशिकांत भुसेवाड, विश्वनाथ वाघमारे, रमेश गोडबोले, डॉ.अब्दुल बाकी, मुकुंद भोळे, राजू मोरे, बंटी लांडगे, ऍड.महेश हाळदे, परमेश्‍वर भुजबळ, बबु काकडे, ऍड.विकास वाघमारे, केशव नवरे, मारोती सवंडकर, कांचन ठाकूर, पप्पू ठाकूर,अर्शद भाई यांची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्वधर्मीय सैलानी बाबा भक्तांना सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सैलानी बाबा दर्गा ट्रस्टच्यावतीने चांदू बुरुडे, राजूसिंघ महाराज, बिट्टूसिंघ महाराज, बाबुभैय्या ठाकूर, ऍड.जोशी, बलभिम बनसोडे, तुळशिराम कोकरे,पप्पू गवारे, तुळशीराम कोकरे, अर्जुन ठाकूर, मुख्तारभाई, चंदु वाघमारे यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments