Homeकरियरresults : पंचशील उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर...

results : पंचशील उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा ८४ टक्के

हदगाव, शेख चांदपाशा| फेब्रुवारी २०२५ ला घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला असून, विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ८४ टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेतून कु.हेंद्रे भारती विजय ७७.३३ टक्के,कदम रितेश सुनील ७४.८३ टक्के,कु.प्राजक्ता अजय पोंगाणे ७३.०० टक्के,धीरज अशोक पाईकराव ७२.०० टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय आले आहेत. तर कला शाखेतून कु.पवार दुर्गा देविदास ८०.५०,कु.गायकवाड पुजा पांडूरंग ७७.१७,कु. हरणे निकीता राजू ७६.१७,कु.पऊळ श्रध्दा अशोक ७५.१७ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकांने उत्तीर्ण झाले आहेत.

विज्ञान शाखेत एकूण १६१ विद्यार्थी परीक्षेत बसले होते सर्वच १६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कला शाखेत एकूण १७६ विद्यार्थी परीक्षेत बसले होते १४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव सुनील हरिहरराव सोनुले, उपाध्यक्षा श्रीमती कुमुद हदगावकर, कोषाध्यक्ष शिवाजीराव तावडे, संचालक वि.मा.टाले, जगदीश कदम, दा.बा. पवार, लक्ष्मीकांत लोणे मुख्याध्यापक बंड्रेवार, पर्यवेक्षक जाधव, दस्तूरकर,देशमुख, संदिप ढोले, काळबांडे, ओमकार मुधोळ,राजू तोष्णीवाल उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा पी.एल.देशमुख प्रा. व्ही.एस.खिसे. प्रा.राठोड,प्रा.श्रीमती पी.जी.पतंगे,पुरुषोत्तम धुळे आदींनी अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments