Abhimanyu and Mehul Gaikwad : हरवलेला मोबाईल परत करून अभिमन्यू व मेहुल गायकवाड या दोन भावंडांनी घडवून दिले माणुसकीचे दर्शन

नांदेड| भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवरोड रस्त्यावर पडलेला मोबाईल दोन भावंडाना सापडला असता त्यांनी तो विवो कंपनीचा मोबाईल भाग्यनगर पोलिसांकडे सुपूर्द केला. त्यानंतर पोलिसांनी तो मोबाईल ज्या व्यक्तीचा होता त्या व्यक्तीस परत दिला. अभिमन्यू महेंद्र गायकवाड व मेहुल महेंद्र गायकवाड या दोन भावंडांनी रस्त्यावर सापडलेला मोबाईल परत करून माणुसकीचे दर्शन घडवून दिले असून पोलिसांनी या दोन्ही भावंडांचे कौतुक केले आहे.

तरोडा नाका परिसरातील शिवरोड नावाने प्रसिद्ध असलेल्या रस्त्यावर नेहमी वाहनाची वर्दळ असते. 28 एप्रिल रोजी सांयकाळी आदर्श कांबळे हा युवक आपल्या दुचाकीवरून या रस्त्याने जात असताना त्याच्या पॅन्टच्या खिशातून मोबाईल खाली पडला. दरम्यान याच रस्त्याने अभिमन्यू महेंद्र गायकवाड व मेहुल महेंद्र गायकवाड हे खेळून घरी परत जाताना त्यांना तो विवो कंपनीचा मोबाईल सापडला.

त्यांनी तात्काळ त्यांचे वडील पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांना सांगितले. त्या पितापुत्रानी क्षणाचा हि विलंब न करता तो सापडलेला मोबाईल भाग्यनगर पोलिसांकडे जमा केला. त्यानंतर आदर्श कांबळे व त्यांच्या वडिलांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात येऊन सदरील मोबाईल आमचा असल्याची पुष्टी केली. भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, पोलीस कर्मचारी चन्ने यांनी अभिमन्यू व मेहुल यांच्या हस्ते तो मोबाईल कांबळे यांना सुपूर्द केला.व दोन्ही भावंडांचे कौतुक केले आहे.

बक्षीस म्हणून दिलेले पैसे अभिमन्यू ने केले परत…
आदर्श कांबळे यांच्या वडिलांनी मोबाईल सापडल्यामुळे अभिमन्यू यास पाचशे रुपये बक्षीस म्हणून दिले असता त्याने ते पैसे परत केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button