करियरनांदेड

Com Shilatai Thakur ; अतिदुर्गम व डोंगराळ माहूर येथील कॉ.शिलाताई ठाकूर यांची गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्षपदी निवड

नांदेड। आरोग्य अभियानातील महत्वाचा दुवा असलेल्या गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे पहिले राज्य अधिवेशन नुकतेच २० एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे पार पडले.

त्या अधिवेशनाला मार्गदर्शन करण्यासाठी उदघाटक म्हणून सीटूचे राज्य सरचिटणीस ऍड.कॉ. एम.एच.शेख,राज्य कोषाध्यक्ष कॉ. के.आर.रघु,राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, कॉ. वसंत पवार, आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा कॉ.आनंदीताई अवघडे, कोषाध्यक्ष कॉ. अर्चनाताई घुगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून राज्यभरातून मोठ्या संख्येने गटप्रवर्तक ताई पंढरपूर येथे एकत्रित आल्या होत्या. अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी नूतन राज्य कमिटी निवडण्यात आली असून राज्य कमिटी मध्ये एकूण ५७ सदस्य असून १९ पदाधिकारी निवडण्यात आले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ तालुका म्हणून सुपरिचित असलेल्या माहूर येथील कॉ. शिलाताई ठाकूर यांची राज्यअध्यक्ष तर सरचिटणीस पदी कॉ.पुष्पा पाटील आणि कोषाध्यक्ष पदी कॉ.ज्योती उराडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

सदरील राज्य कमिटी मध्ये नांदेड जिल्ह्यातील गटप्रवर्तक कॉ.वर्षाताई सांगडे व कॉ.सुनीताताई पाटील यांची राज्य कमिटी सदस्य पदी निवड झाली. उपरोक्त तिन्हीही निवडलेल्या गटप्रवर्क ताई सीटू नांदेड जिल्हा कमिटीत पदाधिकारी असून कामगार – कर्मचारी यांच्या प्रश्नावर सातत्याने लढणाऱ्या रनरागिणी आहेत.

जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. १ मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात सीटू नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने कॉ.शिलाताई ठाकुर, कॉ.वर्षाताई सांगडे व कॉ. सुनीताताई पाटील यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉ. गंगाधर गायकवाड यांनी कळविले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button