HomeकरियरJigyasa Abhyasika ; डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिज्ञासा अभ्यासिकेत तहसीलदार परळीकर...

Jigyasa Abhyasika ; डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिज्ञासा अभ्यासिकेत तहसीलदार परळीकर याचा हस्ते भूमीपुत्रांचा गौरव

लोहा l शिक्षण हे जीवन परिवर्तनाचे मध्यम आहे .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुष्यभर जर तुम्ही शिकलात तर अथांग ज्ञानाच्या सागरात आपण गुडघाभर सुद्धा जाणार नाही .त्याची शिकवण अंगीकार करणे गरजेचे आहे.जिज्ञासा अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते अभ्यासाची सोय केलीं जाते ही कौतुकास्पद बाब होय असे मार्गदर्शन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने लोह्यातील जिज्ञासा अभ्यासिका येथे तहसीलदार परळीकर याच्या हस्ते गुणवंताचा व सामाजिक समता निर्माण करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , रामराव सूर्यवंशी , दता वाले, सोनू संगेवार छत्रपती धुतमल, प्रा डी एम पवार, प्रा संजय बालाघाटे, हरिभाऊ चव्हाण हरिभाऊ चव्हाण, मुख्याध्यापक डी ई वडजे, मुख्याध्यापक एच जी पवार, व्ही के कांबळे, प्रा डॉ शैलेंद्र महाबळे , जमादार लाडेकर याची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी सामाजिक समता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणारे मुकदम, पवार , मनोज चव्हाण, हरिभाऊ चव्हाण ,प्रा शिंदे, पत्रकर गोविंद कदम, दिनेश सावकार यासह मान्यवर उपस्थित होते
तहसीलदार परळीकर ,पोलीस निरीक्षक आयलाने यांनी मार्गदर्शन केले अभ्यासू असलेले माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांनी अभ्यासिकेला पुस्तके दिली प्रास्ताविक हरिहर धुतमल यांनी केले संचलन व आभार काशिनाथ शिरसिकर यांनी केले प्रवीण धुतमल , बालाजी धनसडे, तनय धुतमल ओम।पुरी यासह अभ्यासिकातील विद्यार्थ्यांनी परिश्रम केले

उपविभागीय अधिकारी संगेवार यांचे मार्गदर्शन
उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी जिज्ञासा अभ्यासिक येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व जिद्दीने अभ्यास करावा असे मार्गदर्शन केले नायब तहसीलदार रेखा चामणर, पंचशिल।कांबळे हरिहर धुतमल , कर निरीक्षक सुतार, वैजनाथ शेटे यांची उपस्थित होते

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments