Wednesday, May 13

police officers : कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

नांदेड| जिल्ह्यात सोमवार 14 एप्रिल रोजी आंबेडकरी अनुयायी यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येते. येत्या 14 एप्रिल रोजी तसेच त्यानंतर 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जिल्हयातील ग्रामीण भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणुका व इतर कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येते. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व जिल्ह्यात शांतता टिकुन राहावी म्हणुन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 1951 प्रमाणे प्रदान झालेल्या अधिकारान्वे पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केला आहे.

12 एप्रिल 2025 चे 00:01 वाजता पासून ते 30 एप्रिल 2025 चे 24 वाजतापर्यत नांदेड जिल्हयात सर्व पो.स्टे. स्वाधिन अधिकारी त्यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 मधील पोट कलम “अ” ते “ई” प्रमाणे पुढील लेखी किंवा तोंडी आदेश आपआपले हद्दीत देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे.

रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कोणत्यारितीने चालावे कोणत्यारितीने वागावे ते फर्माविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जावे किंवा जाऊ नये हे ठरविण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्याप्रसंगी व पुजेअर्चेनेच्या प्रार्थना स्थळांच्या सर्व जागेच्या आसपास पुजे-अर्चेनेच्यावेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होण्याचा संबध असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबाबत. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये सर्व धक्यावर व धक्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेमध्ये व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरेचे नियमन करण्याबद्दल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये नमुद केलेल्या कोणत्याही हुकूमापेक्षा कमी दर्जाचे व त्या पुष्टी देणारे दुय्यम अधिकाऱ्यांना जबाबदारीवर हुकूम करण्याचा मार्गदर्शन पर आदेश देण्याबाबत. सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपण आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना देण्यासंबधी. कोणीही सदरचा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्हयात जाहिर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबधीत पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ, सभेची जागा मिरवणुकीचा व मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा पूर्व परवानगी शिवाय आयोजित करु नयेत. तसेच संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आदेशांचे पालन करावे. सदर जाहिरसभा, मिरवणुक पदयात्रा, समायोचीत घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बांधा येवु शकतो अशा घोषणा देऊ नयेत.

हा आदेश लग्नाच्यावरातीस, प्रेतयात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल. सदरचा आदेश 12 एप्रिल 2025 चे 00:01 वाजेपासून ते 30 एप्रिल 2025 रोजीचे 24 वाजेपर्यंत लागू राहील, असेही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आदेश स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!