police officers : कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड| जिल्ह्यात सोमवार 14 एप्रिल रोजी आंबेडकरी अनुयायी यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येते. येत्या 14 एप्रिल रोजी तसेच त्यानंतर 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जिल्हयातील ग्रामीण भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणुका व इतर कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येते. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व जिल्ह्यात शांतता टिकुन राहावी म्हणुन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 1951 प्रमाणे प्रदान झालेल्या अधिकारान्वे पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केला आहे.
12 एप्रिल 2025 चे 00:01 वाजता पासून ते 30 एप्रिल 2025 चे 24 वाजतापर्यत नांदेड जिल्हयात सर्व पो.स्टे. स्वाधिन अधिकारी त्यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना मह...
