Thursday, May 14

Chhava ; छावा चित्रपट रामनगर नरहरी महाराज मंदिर परिसर सिडको मोफत‌ दाखविण्यात आला , महिला युवक नागरीक यांच्यी गर्दी

नवीन नांदेड l छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेला ऐतिहासिक लोकप्रिय छावा चित्रपट रामनगर नरहरी महाराज मंदिर सिडको येथे 15 मार्च रोजी सायंकाळी 8 वाजता विनामूल्य दाखविण्यात आला यावेळी परिसरातील महिला व नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते, माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यात लोकप्रिय झालेला व संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेला छावा चित्रपट रामनगर‌, नरहरी महाराज मंदिर सिडको येथील प्रांगणात दाखविण्यात आला, यावेळी मार्गदर्शक प्रकाश लांडगे,आयोजक पवन जाधव‌ व सहकारी आदिनाथ दरेगावे,सौरभ चालीकवार सिद्धेश जाधव व मित्रमंडळींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

चित्रपट सुरू असताना वेळोवेळी विविध देखावे प्रसंगी,लढाई, गडकिल्ले आधारावर उपस्थिती युवक यांनी जयभवानी जय शिवाजी, संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष केला, अनेकांनी हा चित्रपट पहात असताना अनेक दृश्ये पाहुन गहीवरून गेले.
‌ मोफत दाखविण्यात आलेल्या चित्रपटाचे अनेकांनी आयोजकाचे अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!