Chhava ; छावा चित्रपट रामनगर नरहरी महाराज मंदिर परिसर सिडको मोफत दाखविण्यात आला , महिला युवक नागरीक यांच्यी गर्दी
नवीन नांदेड l छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेला ऐतिहासिक लोकप्रिय छावा चित्रपट रामनगर नरहरी महाराज मंदिर सिडको येथे 15 मार्च रोजी सायंकाळी 8 वाजता विनामूल्य दाखविण्यात आला यावेळी परिसरातील महिला व नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते, माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यात लोकप्रिय झालेला व संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेला छावा चित्रपट रामनगर, नरहरी महाराज मंदिर सिडको येथील प्रांगणात दाखविण्यात आला, यावेळी मार्गदर्शक प्रकाश लांडगे,आयोजक पवन जाधव व सहकारी आदिनाथ दरेगावे,सौरभ चालीकवार सिद्धेश जाधव व मित्रमंडळींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
चित्रपट सुरू असताना वेळोवेळी विविध देखावे प्रसंगी,लढाई, गडकिल्ले आधारावर उपस्थिती युवक यांनी जयभवानी जय शिवाजी, संभाजी महाराज य...
