धार्मिकनांदेड

Train carrying eight hundred beneficiaries : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील आठशे लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना

नांदेड| मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत नांदेड येथून अध्योध्या धाम येथे जाण्यासाठी पहिली रेल्वे शनिवार 8 मार्चला सकाळी 11 वा. आठशे भाविकांना घेऊन रवाना झाली आहे. या रेल्वेला लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आज रवाना करण्यात आले.

482090935 1050536703766419 1363377223950238975 n Train carrying eight hundred beneficiaries : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील आठशे लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना

या रेल्वेला राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. तर रेल्वे स्थानकावर बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार आनंद पाटील बोंढारकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांची उपस्थिती होती.

482266237 1050536690433087 6452904812027905027 n Train carrying eight hundred beneficiaries : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील आठशे लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना

राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थ स्थळांना जावून, मनशांती तसेच आध्यामिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील जेष्ठ नागरिक, जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्राना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 14 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यान्वीत झाली आहे.

483661174 1050536577099765 8406990146338654717 n Train carrying eight hundred beneficiaries : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील आठशे लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना

आज हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर सकाळपासून आयोध्याला जाणाऱ्या प्रवाशांची लगबग होती. सर्व प्रवाशांना समाज कल्याण विभागामार्फत ओळखपत्र देण्यात आले. तसेच त्यांच्या बसण्याच्या ठिकाणासह त्यावर बोगी नंबर लिहिला होता. सर्व ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांच्या पूर्ण प्रवाशात त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक वैद्यकिय टिमसोबत आहे. तसेच सोबत 15 कर्मचारी असणार आहेत.

482302785 1050536853766404 5868632807305395028 n Train carrying eight hundred beneficiaries : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील आठशे लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना

आज रेल्वेस्थानकावर शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनाला बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार आनंद पाटील बोंढारकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!