नांदेड| दगड धानोरा ता. पुसद येथिल श्रीमती नलिनी उर्फ स्नेहलता रंगराव देशमुख यांच दि. २ मार्च रविवारी सकाळी ३:३० वाजेच्या दरम्यान निधन झाल. मृत्यु समयी त्या ७० वर्षाच्या होत्या.


एप्रिल २०२४ मध्ये मोठा मुलगा संजय देशमुख यांच अकाली ह्रदय विकाराने निधन झाल होत, त्यांच्या निधनाच दु:ख त्यांना असह्य झाल, तेंव्हा पासुन त्या पुरत्या खचल्या होत्या. त्यांच्या पश्चात सहा कन्या, दोन मुले, सुना, नातु, पंतु असा मोठा परीवार आहे. त्या स्व. विनायकराव देशमुख सरसमकर यांची थोरली कन्या तसेच डॉ. रंगराव देशमुख धानोरकर यांची पत्नी, स्व. संजय देशमुख व अ़ॅड. शैलेश देशमुख यांच्या मातोश्री होत्या.

तसेच माजी बांधकाम सभापती प्रतापराव विनायकराव देशमुख सरसमकर यांची बहीण, हिमायतनगर ग्रामिण रूग्णाल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रेयस संजय देशमुख यांच्या आजी होत्या. त्यांचे पार्थीवावर आज दि. २ मार्च २०२५ रविवारी दगड धानोरा ता. पुसद येथे सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
