HomeनांदेडFed up with the partial pipeline project of Himayatnagar : हिमायतनगरच्या अर्धवट...

Fed up with the partial pipeline project of Himayatnagar : हिमायतनगरच्या अर्धवट नळयोजनाला कंटाळून नागरिकांनी सुरु केले बेमुदत आमरण उपोषण

हिमायतनगर, अनिल मादसवार| शहराची कायमस्वरूपी तहान भागविण्यासाठी १९ कोटी १९ लक्ष रुपयाच्या मंजूर झालेल्या नळयोजनेचे काम गेल्या सहा वर्षांपासून अपूर्ण (Fed up with the partial pipeline project of Himayatnagar) आहे. त्यामुळे शहरातील ३० हजार लोकसंख्येला दिवाळीपासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकदा निवेदन देऊनही ठेकेदार काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करत असून, आता भीषण पाणी टंचाईचा सामना शहरावासीयांना करावा लागत आहे. तात्काळ हि योजना सुरु करून नागरिकांची तहान भागवावी या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत घरातील नळाला पाणी येणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यानी घेतला आहे.

हिमायतनगर नगरपंचायत कार्यालय अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती पाणी पुरवठा योजनेचे काम दिनांक ०२/०७/२०१९ पासून सुरु झाले. शहराच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा कामासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नगरपंचायत हिमायतनगर असा तिघांचा मिळून १९ कोटी १९ रुपये इतका निधी उपलब्ध झाला होता. नळयोजनेचे काम गुत्तेदाराने २४ महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या शर्तीवर करारनामा केला. जवळपास ६ वर्षाचा काळ संपत आला असून, पाणीपुरवठा योजनेचे काम आजपर्यंत १००% पूर्ण झाले नाही. परिणामी हिमायतनगर शहरातील जनतेचे पिण्याच्या व इतर वापराच्या पाण्याची दुर्दशा कायम आहे. याला जबाबदार कोण…? असा प्रश्न शहरवासीयांनी उपस्थित केला असून, सदरचे काम करणाऱ्या ठेकेदार में. एम.टी.फड यांनी वेळेत पूर्ण केले नाही. म्हणून दंड का आकारण्यात येऊ नये…असा सवालही उपोषणकाऱ्यानी उपस्थित केला आहे.

हिमायतनगर शहराच्या पाणीपुरवठा कामाबाबत गेल्या वर्षी नागरिकांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तेव्हा नगरपंचायत कार्यालयाने दिनांक १७ में २०२४ रोजी पत्राद्वारे शे. हनीफ शे. बाबू यांना नळयोजना १००% पूर्णत्वास जात असल्याचे नियोजित केल्याचे पत्र दिले, मात्र अद्यापपर्यंत हि नळयोजना कार्यान्वित झाली नाही. याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नांदेड, यांचे अधिकारी व कर्मचारी यांचे कुठल्याही प्रकारचे लक्ष नाही आणि नळयोजना कामावर नियंत्रण नाही. दिलेल्या पत्रास ९ महिने पूर्ण झाले तरीही शहरात पाण्याचा थेंब सुद्धा आलेला नाही. आज पर्यंत नगरपंचायत हिमायतनगर जि. नांदेड, ह्यांच्याकडून सदरील गुत्तेदारास कामाचे बिल १५.२८ कोटी रुपये इतका निधी देऊन टाकला आहे. मात्र काम अद्यापपर्यंत अर्धवट स्वरूपाचे आहे.

IMG 20250225 172356 Fed up with the partial pipeline project of Himayatnagar : हिमायतनगरच्या अर्धवट नळयोजनाला कंटाळून नागरिकांनी सुरु केले बेमुदत आमरण उपोषण

हिमायतनगर शहरातील नागरिकांना मागील २५ ते ४० वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या दिनांक २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत शहरवासीयांना पाणी पुरवठा सुरु न केल्यास दिनांक २५ पासून हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास करणार आहोत. असा इशारा एका निवेदनाद्वारे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट घेऊन दिला होता. तरी कोणतीही ठोस पाऊले उचलल्या गेली नसल्याने आज दिनांक २५ फेब्रुवारीपासून जफर मोहम्मद खान नजर मोहम्मद खान, बाबाराव संभाजी शिंदे, शेख हनीफ शेख बाबू, कॉमरेड दिगांबर काळे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला शहरातील सर्वसामान्य जनतेतून पाठिंबा मिळत आहे, आत्तातरी प्रशासन अर्धवट अवस्थेत असलेल्या हिमायतनगर शहरासाठी मंजूर पाणीपुरवठा नळयोजनेच्या अर्धवट कमला गती देऊन शहरवासीयांची तहसीन भिगविली जाईल का..? याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष् लागून आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments