लोहा l नांदेडच्या वैद्यक क्षेत्रात नव्या पिढीतील तरुण डॉक्टर अनेक गुंतागुंतीच्या शास्त्रक्रिया येथेच करत आहेत.पुणे-,मुंबई,हैदराबाद येथे जे ऑपरेशन होते तेच नांदेड मध्ये कमी खर्चात यशस्वी उपचार केला जात आहे.


नारायणा या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये हृदयाचे बायपास व अन्य जटिल व्याधीं असलेल्या चौऱ्याहत्तर वर्षीय जेष्ठ नागरिकांवर प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉ जळबाजी मोरे व प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ आशिष हटकर यांनी अतिशय कुशलतेने आणि नवं तंत्रज्ञान व आरोग्यविषयक ज्ञानाचे उपयोजन करत फुटलेल्या पिताशयाच्या पिशवीतील एकशे सत्तर ग्रॅम खडे व शंभर मिली लिटर” पु ” बाहेर काढला ही शस्त्रक्रिया रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरणार होय.

नांदेडची वैदयकीय सेवा पुणे,मुंबई,हैद्राबाद येथील उपचारा इतकी अचूक निधन व उपचार करणारी आहे विद्यक।क्षेत्रातील अद्यावत ज्ञान व तंत्रज्ञान यात पारंगत असलेले सुपर वेगवेगळ्या अवयव्यांचे स्पेशालिस्ट येथे आहेत.

मुंबई येथे सेवेत असलेले हडको येथील राज्य विक्रीकर अधिकरी यांचे .७४ वर्षीय वडील त्यांचे सात वर्षा पूर्वी ओपन हार्ट बायपास सर्जरी झाली.त्यांना लोह्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ मिलिंद धनसडे याच्याकडे उपचारासाठी ऍडमिट करण्यात आले होते त्यांनी उपचार केला स्थिर प्रकृती झाल्यावर नारायणा हॉस्पिटलमध्ये पाठविले पाठविले (रुग्ण व नातेवाईक याचे नाव टाळले)

ताप , किडणी इम्फेक्शन, बीपी शुगर ,हृदय पंपिंग २३ टक्के, वय झालेले असा सगळ्या शारीरिक व्याधी आहेत पिताशयात गाठी झाल्याचे प्राथमिक निधन शासकीय मेडिकल कॉलेज नांदेड चे प्रा डॉ विद्याधर केळकर यांनी सांगितले . पिताशय पिशवी फुटली आणि तेथे “पु ” जमा झाला त्यामुळे रुग्ण अस्वस्थ अवस्थेत गेला.विश्वा “हॉस्पिटल चे प्रसिद्ध लेप्रोस्कोपी व पोटविकार तज्ज्ञ डॉ जळबाजी मोरे, प्रसिद्ध .कँसर तज्ज्ञ डॉ आशिष अशोकराव हटकर यांनी दुर्बीणद्वारे “नारायण हॉस्पिटलमध्ये रुग्णावर गुरुवारी रात्री दहा वाजता शस्त्रक्रिया सुरू केली जवळपास अडीच तास ऑपरेशन चालले यात पिताशय पिशवीतील ७० खडे ज्याचे जवळ १७० ग्रॅम व शंभर मिली पु बाहेर काढण्यात आला.
हृदयरोग तज्ञ डॉ अजीत काब्दे, पोटविकार तज्ञ डॉ कैलास कोल्हे, डॉ गणेश काळे, भूल तज्ज्ञ डॉ दिनेश आरेपल्लू या तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य त्यांना मिळाले. रुग्णांचे वय त्याना झालेले वेगवेगळे आजार असाही परिस्थितीत डॉ मोरे डॉ आशिष व टीमने केलेली यशस्वी शस्त्रक्रिया रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारी ठरली आहे. याच ऑपरेशनसाठी पुणे मुंबई हैदराबाद येथे किमान पाच लक्ष रुपये खर्च आला असता पण नांदेड मध्ये कमी खर्चात यशस्वी ऑपरेशन झाले. वडिलांवर असा परिस्थितीत ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे कुटुंबियांनी आभार मानले नांदेड मध्ये गुंतागुंतीच्या अवघड शस्त्रक्रिया होताहेत हे रुग्ण व नातेवाईकांसाठी दिलासा देणारे आहे.