HomeनांदेडBlooming Kids Public School ; पाल्यांना घडवण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी योगदान द्यावा :...

Blooming Kids Public School ; पाल्यांना घडवण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी योगदान द्यावा : दीपा बियानी

नांदेड l प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या उज्जवल भविष्यासाठी प्रयत्नरत असतो. पण पालकवर्ग आपल्या पाल्याच्या जडण घडण व विकासासाठी फक्त शिक्षकांवर निर्भर असतात. तर पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांसोबतच पालकांनीही परिश्रम घ्यावा असे मनोगत प्रख्यात वक्ता आणी दैनिक प्रजावाणीच्या मानसी पुरावणीच्या संपादिका प्रा. दीपा गोवेर्धन बियानी यांनी नुकतेच कुसुम सभागृह येथे पार पडलेल्या ब्लूमिंग किड्स पब्लिक स्कूल शाळेच्या वार्षिक स्नेहसम्मेलनात केले.

त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. तत्पूर्वी शालेय वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्धघाटन त्यांच्या हस्ते पार पडले. या वेळी मुख्य पाहुणे म्हणून गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक स. गुरबचनसिंघ सिलेदार, शिवसेना शिंदे गटाचे नेते श्री सुहास बालाजीराव कल्याणकर, साहित्यिक व पत्रकार स. रविंदरसिंघ मोदी, सामाजिक कार्यकर्ते स. रविंद्रसिंघ बुंगई, शाळेच्या संचालिका हरजिंदरकौर सोहल आदींची उपस्थिती होती.

IMG 20250216 WA0002 Blooming Kids Public School ; पाल्यांना घडवण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी योगदान द्यावा : दीपा बियानी

आपल्या मनोगतात दीपा बियानी पुढे म्हणाल्या की, वर्तमान युगात शाळेत किंवा महाविद्यालयात विद्यार्थियांना चांगले आणी व्यावहारिक शिक्षण मिळावे अशी अपेक्षा पालकवर्ग करतात. पण शिक्षणासोबत चांगले संस्कार शिकणे देखील तेवढेच महत्वाचे असते.

IMG 20250216 WA0003 Blooming Kids Public School ; पाल्यांना घडवण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी योगदान द्यावा : दीपा बियानी

आज आपले कुटुंब लहान – लहान होत चालले आहे. पूर्वी संयुक्त कुटुंब प्रणाली होती तेव्हा आई, आजी – आजोबा कढून खूप काही शिकायला मिळत असे. पण आज लहान कुटुंबात आई वडिलांना वेळ नाही. आज अनेक नाते कायमची हरपुन गेली आहेत. तेव्हा कुटुंबाचे महत्व टिकवणाऱ्या संस्कारीत अशा मुलांमूली निर्माण होणेही तेवढेच गरजेचे झालेले आहे.

आपला कुटुंब, आपला समाज, आपली शाळा, आपला प्रांत आणी आपला देश अशा भावना विद्यार्थ्यांत रुजविले गेले पाहिजे. त्यासाठी पालकांची जवाबदारी मोठी आहे. कारण एखादा विद्यार्थी शाळेत शिक्षकांसोबत चार ते पाच तास घालवतो पण इतर शेष वेळ तो पालकांसोबतच असतो. म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासात हातभार लावणे जास्त रास्त होईल, असे त्या म्हणाले.

सरदार गुरबचनसिंघ सिलेदार यांनी आपल्या भाषणात विद्यार्थी तसेच पालकांना शिक्षण आणी कलागुण वृद्धि विषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार स. रविंदरसिंघ मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या जिवनात अभ्यासासोबतच स्नेहसम्मेलनाचे महत्व अधिक असल्याचे पटवून दिले. श्री सुहास बालाजीराव कल्याणकर यांनी विद्यार्थी आणी पालकांना शुभेच्छा दिल्या.

शाळेच्या संचालिका हरजिंदरकौर सोहल यांनी प्रमुख अतीथींचे शॉल, पुस्तक आणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले व आपल्या प्रस्ताविकात शाळेत सुरु असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. या स्नेहसम्मेलनाचे वैशिष्ट्य हे की विद्यार्थ्यांसोबत पालकांनी देखील नृत्य, स्पर्धा, खेळ आणी उपक्रमांत सहभाग घेतला. विजयेत्या पालकांचे शाळेतर्फे सत्कार करण्यात आले.

चिमूकल्या मुलांमूलींनी वेगवेगळ्या गीतांवर नृत्य प्रस्तुत केले. यावेळी सरदार गुरदीपसिंघ गोरमनगर, जसप्रीतकौर गोरमनगर यांनी स्नेहसम्मलेनाचे सूत्र सांभळलें. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी क्रिष्टि कौशिक मित्रा यांनी केले. तर इशिका सालवे, सुखबीर सिंघ सोहल, ओम पत्तेवार, शुभम गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले. स्नेह सम्मेलनात विद्यार्थी, पालक, आजी – आजोबा आणी मित्रपरिवाराची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments