Blooming Kids Public School ; पाल्यांना घडवण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी योगदान द्यावा : दीपा बियानी
नांदेड l प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या उज्जवल भविष्यासाठी प्रयत्नरत असतो. पण पालकवर्ग आपल्या पाल्याच्या जडण घडण व विकासासाठी फक्त शिक्षकांवर निर्भर असतात. तर पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांसोबतच पालकांनीही परिश्रम घ्यावा असे मनोगत प्रख्यात वक्ता आणी दैनिक प्रजावाणीच्या मानसी पुरावणीच्या संपादिका प्रा. दीपा गोवेर्धन बियानी यांनी नुकतेच कुसुम सभागृह येथे पार पडलेल्या ब्लूमिंग किड्स पब्लिक स्कूल शाळेच्या वार्षिक स्नेहसम्मेलनात केले.
त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. तत्पूर्वी शालेय वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्धघाटन त्यांच्या हस्ते पार पडले. या वेळी मुख्य पाहुणे म्हणून गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक स. गुरबचनसिंघ सिलेदार, शिवसेना शिंदे गटाचे नेते श्री सुहास बालाजीराव कल्याणकर, साहित्यिक व पत्रकार स. रविंदरसिंघ मोदी, सामाजिक कार्यकर्ते स. रविंद्रसिंघ बुंगई, शाळेच्या संचालि...
