Homeबाळाच्या जीवनातील पहिले हजार दिवस महत्त्वाचे - जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप...

बाळाच्या जीवनातील पहिले हजार दिवस महत्त्वाचे – जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे -NNL

नांदेड। बाळाच्या जीवनातील पहिले हजार दिवस हे शारिरीक, मानसिक व बौद्धिक वाढीसाठी महत्त्वाचे असतात. बाळाच्या जीवनातील हा सुवर्णकाळ आहे.  स्तनपानासंबंधी समाजातील गैरसमजुती व चुकीच्या प्रथा दूर करण्यासाठी जनजागृती करावी, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले.

महिला व बालविकास विभागाच्यावतीने नांदेड जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज स्तनपान व शिशु पोषण या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  रेखा काळम-कदम, युनिसेफचे राज्य सल्लागार पी. डी. सुदामे यांची उपस्थिती होती. स्तनपानामुळे बाळाच्या पोषणासह बाळाची रोगप्रतिकारशक्ती ही वाढते, असे मत संदीप माळोदे यांनी व्यक्त केले.

IMG 20221221 WA0035 बाळाच्या जीवनातील पहिले हजार दिवस महत्त्वाचे - जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे -NNLयावेळी युनिसेफचे पी. डी. सुदामे ह्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत त्याची लांबी 86 सेंटीमीटर होऊ शकते, बाळ 75 टक्के हुशार होऊ शकते, बाळाचे वजन 12 कि.ग्रॅ. पर्यंत वाढू शकते. यासाठी गरोदर माता व स्तनदा माता यांनी गरोदरपणात दिवसातून चार वेळेस आहार घेणे आवश्यक आहे. कुटुंबातून यासाठी मातेला मदत, प्रोत्साहन व संरक्षण प्रत्येक सदस्याने द्यावे. बाळंतपण दवाखान्यातच करावे. जन्म झाल्यावर आईचा व बाळाचा एकमेकाला स्पर्श करून स्तनपानाची सुरुवात करावी, पहिले सहा महिने बाळाला निव्वळ स्तनपान करावे, सहा महिने पूर्ण झाल्यावर घरगुती स्वच्छतापूर्वक बनवलेला पुरेसा व मऊसर आहार बाळास सुरू करून किमान दोन वर्षे आपले दूध बाळाला पाजावे. 

स्तनपान देताना व भरवताना बाळाशी संवाद साधावा. स्तनपान व योग्य पूरक आहारामुळे 20 टक्के बालमृत्यू टाळता येतात हा संदेशही उदाहरणांद्वारे त्यांनी पटवून दिला. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पर्यवेक्षिका यांनी सदर प्रशिक्षण त्यांच्या विभाग स्तरावर राबवून अंगणवाडी सेविका यांना या ज्ञानाचे दूत करून घरोघरी हे ज्ञान पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सोनवणे तर उपस्थितांचे आभार विशालसिंग चव्हाण यांनी केले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका ह्यांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments