Wednesday, May 13

Himayatnagar Police Jomat Revenue Department Komat : हिमायतनगर पोलीस जोमात महसूल विभाग कोमात; सलग दुसऱ्या दिवशी वाळू चोरावर कार्यवाही

हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ मराठवाड्यच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या दिघी पात्रातून एक निळ्या रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉलीतुन वाळूची चोरी करणाऱ्यावर हिमायतनगर पोलिसांनी कार्यवाही ( Himayatnagar Police Jomat Revenue Department Komat; For the second day in a row, action was taken against the sand thief) केली आहे. यात 5 लक्ष 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हिमायतनगर तालुक्यातील रेती माफ़ियामध्ये खळबळ उडाली आहे. बहुतंशी रेती माफिया हे राजकीय नेत्याचे हस्तक असल्याने त्यांच्या वाहनावर आणि त्यांनी साठवून ठेवलेल्या नदीपात्र परिसरातील रेतीच्या साठ्यावर देखील पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी कार्यवाही करतील का..? याकडे पर्यावरण प्रेमी नागरिकांचे लक्ष लागून आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये वाळु माफीयाकडुन अवैद्य मार्गान वाळू उपसा व वाहतुक करुन शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात आहे. हि बाब हेरून पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी चोरीच्या मार्गाने केले जाणारे काळे धंदे उघड पाडण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रामुख्यानं दिले होते. त्यानंतर हिमायतनगर पोलीस अलर्ट मोडवर आली असून, पैनगंगा नदीपात्रातून वाळू चोरून नेणाऱ्या माफियांवर कार्यवाही सुरु केली आहे. एका दिवसाआड पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीने वाळू माफियांचे धाबे दणाणले असून, पोलीस जोमात आणि महसूल विभाग कोमात असे चित्र हिमायतनगर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

अवैद्य वाळू उपसा व वाहतुक होत असले तर कार्यवाही करा असे नुकतेच हिमायतनगर येथे भेट दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने दि.11/02/2025 रोजी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना मध्यरात्री 02.10 वाजेच्या सुमारास हिमायतनगर तालुक्यातील दिघी शिवारातील भगवान पाटील यांचे शेडजवळ, पैनगंगा नदी पात्रामध्ये एक निळ्या रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली वाळुने भरुन चोरटी वाहतुक करीत असलेबाबत खात्रीशीर माहीती पोलिसांना मिळाली होती. हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर जाधव यांनी क्षणाचाही विलंब न लावता सहकाऱ्यांसह मध्यरात्री 02.25 वा.चे सुमारास दिघी परिसरात असलेल्या नदीपात्रात छापा टाकून एक ब्रास वाळुने भरलेले ट्रॅक्टर ताब्यात घेऊन वाळू चोरी करणाऱ्या आरोपीतांविरूध्द हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा केला आहे.

IMG 20250211 WA0021 Himayatnagar Police Jomat Revenue Department Komat : हिमायतनगर पोलीस जोमात महसूल विभाग कोमात; सलग दुसऱ्या दिवशी वाळू चोरावर कार्यवाही

यात एक निळ्या रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर क्र. MH-29-AQ-2876 व लाल रंगाची ट्रॉली अंदाजे 5,00,000/- रु. व एक ब्रास वाळु 05,000/- रु. अशी एकूण 05,05,000/- रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली असुन, हिमायतनगरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव यांचे फिर्याद वरुन आरोपी 1) गजानन श्रीराम माने, 37 वर्ष, धंदा चालक, रा. बोरी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ 2) नारायण कोडबा माने, 62 वर्ष, मालक, रा. बोरी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ यांच्या विरुद्ध गु.र.क्र.27/2025, कलम 303(2) बी.एन.एस 2023 सह कलम 4,21 खान आणि खनिज (नियम आणि विकास) अधिनियम 1957 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास बिट पोहकॉ. पाटील हे करीत आहेत.

IMG 20250211 WA0022 Himayatnagar Police Jomat Revenue Department Komat : हिमायतनगर पोलीस जोमात महसूल विभाग कोमात; सलग दुसऱ्या दिवशी वाळू चोरावर कार्यवाही

रेतीमाफियां विरोधातील हि कार्यवाही अबिनाश कुमार (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक जि. नांदेड, खंडेराय धरणे (म.पो.से.) अप्पर पोलीस अधिक्षक भोकर, सूरज गुरव (म.पो.से.) अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेड, श्रीमती शफकत अमना (भा.पो.से.) उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भगत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे. दिलेल्या आदेशानुसार उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठांनी हिमायतनगर पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!