Raj Purohit Bakery and Sweetmart burnt down : मुदखेड शहरात राज पुरोहित बेकरी व स्वीटमार्ट जळून खाक; आठ लाखांचे नुकसान

नांदेड| जिल्ह्यातील मुदखेड शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या स्वीट मार्टला शॉर्टसर्किट होऊन आग (Raj Purohit Bakery and Sweetmart burnt down) लागल्याने दुकान जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत जवळपास आठ लाखांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी युवकांनी धाव घेतल्याने इतर दुकानांचे नुकसान टळले असून, युवकांच्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे .

नांदे जिल्ह्यातील मुदखेड शहरातील रेल्वे गेट सुभाष गंज या ठिकाणी राज पुरोहित बिकानेर आहे या बेकरी स्वीट मार्ट दुकान आहे. रात्री उशिरा शॉर्टसर्किटने होऊन या दुकानास आग लागली आहे. या आगीत दुकानातील (स्वीटमार्ट) बेकरीचा माल व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठाण म. फेरोज. आसिफ पठाण. म. आखिब शेख मोईन बीट जमादार बलवीर सिंग ठाकूर नगरपालिका कर्मचारी रमेश हातागळे लक्ष्मण भांगे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आग विझवण्यासाठी युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले. मुजीब पठाण यांनी अग्निशमन दलाशी संपर्क करून पाचारण केले. मुख्य बाजारपेठेतील आगीने उग्र स्वरूप धारण करण्याच्या अगोदर वीज विद्युत पुरवठा त्वरित खंडित करण्यात आला, यामुळे आजूबाजूच्या दुकानास आगीपासून रोखण्यास यश आले आहे. युवकांच्या या धाडसी प्रयत्नामुळे होणारे नुकसान टळले आहे बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी युवकांचे कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button