Homeआलेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीवर आ.श्यामसुंदर शिंदे यांच्या गटाचे वर्चस्व -NNL

आलेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीवर आ.श्यामसुंदर शिंदे यांच्या गटाचे वर्चस्व -NNL

उस्माननगर, माणिक भिसे। आलेगाव ता.कंधार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन शिक्षण समितीच्या निवडणूकीमध्ये कंधार- लोहा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय , आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या गटाने वर्चस्व प्रस्थापित केले असुन आध्यक्ष म्हणून आनंदराव पाटील मोरे यांची तर उपाध्यक्ष म्हणून बळवंतराव पाटील मोरे यांची निवड करण्यात आली.

IMG 20221220 WA0054 आलेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीवर आ.श्यामसुंदर शिंदे यांच्या गटाचे वर्चस्व -NNLउस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे आलेगाव ता.कंधार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती निवडण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावण्यात आले होते. शाळेत गावातील सर्व गटातील कार्यकर्ते आमने-सामने उभे राहू लागल्याने निवडणूक घेण्याची परवानगी घेतली. मुख्याध्यापक यांनी पालकांची निवडणूक घेतल्याने पालकवर्गानी ही शालेय शिक्षण समिती निवडण्यासाठी प्रतिष्ठेची केली होती.दोन्ही गट आमने-सामने उभे राहून निवडणूक प्रतिष्ठेची केली.

सदरील मतदान हे उपस्थित पालक कार्यकर्ते मधून चिट्या टाकून सर्व प्रथम सदस्याची निवड करून सदस्यामधूनच अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड करून आ.श्यामसुंदर शिंदे यांचे खंदे समर्थक असलेले आनंदराव पाटील मोरे यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून बळवंतराव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी आलेगाव येथील सरपंच पाटील, म.गा.तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादाराव पाटील मोरे ,पोलीस पाटील वसंतराव मोरे ,मुख्याध्यापक,प्रभाकर कुलकर्णी, खुशालराव मोरे ,यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी नवनिर्वाचित समितीचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

आलेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कंधार लोहा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments