Homeक्राईमaction on sand theft : पोलीस स्टेशन कुंटूर व महसुल प्रशासन यांची...

action on sand theft : पोलीस स्टेशन कुंटूर व महसुल प्रशासन यांची रेती चोरीवर संयुक्त कार्यवाही -NNL

नांदेड| पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार रेती चोरीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. पोलीस स्टेशन कुंटूर व महसुल प्रशासन यांनी संयुक्तपणे गौण खनिज रेती काढण्यासाठी वापरण्यात आलेले तराफे, प्लॅस्टीकचे पाईप व प्लॅस्टीकच्या टाक्या असे एकुण अंदाजे 5000/- ते 6000/- रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत पोलीस स्टेशन हददीतील सर्व अवैध धंदे व अवैध रेती संबंधाने कार्यवाही करण्याचे सर्व पो.स्टे. प्रभारी यांना आदेश दिले आहेत. ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत पोलीस स्टेशन कुंटूर अंतर्गत राहेर गोदावरी नदी पाञात अवैध गौण खनिज रेती काढीत आहेत. अशी गोपनिय माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन कुंटूर येथील प्रभारी अधिकारी सपोनि. रामकृष्ण पाटील व सोबत दुरक्षेञ राहेर येथील बिट अंमलदार सपोउपनि निकम व इतर पोलीस स्टॉफ आणि श्रीमती गायकवाड मॅडम तहसिलदार नायगाव व त्यांचा महसुल स्टॉफ असे संयुक्त मोहिम राबवुन गौण खनिज रेती काढण्यासाठी वापरण्यात आलेले तराफे, प्लॅस्टीकचे पाईप व प्लॅस्टीकच्या टाक्या असे एकुण अंदाजे 5000/- ते 6000/- रुपयाचे साहित्य नष्ट करण्याची कार्यवाई करण्यात आली.

सदर कार्यवाही दरम्यान गोदावरी नदी पात्रातील अज्ञात व्यक्तीकडुन गौण खनिजाचा अवैध उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य तराफे व प्लॅस्टीकचे पाईप व टाक्या नष्ट करण्यात आले असुन महसुल विभागाकडुन अहवाल व पंचनामा प्राप्त होताच, महसुल पथकाचे तक्रारी वरुन पुढील योग्यती कायदेशीर कार्यवाई करण्याची तजविज ठेवली आहे. हि कार्यवाही अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड. रफिक शेख, उप विभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग बिलोली यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करणारे पोलीस अधिकारी अंमलदार व महसुल पथक रामकृष्ण पाटील, सहा. पोलीस निरीक्षक पो.स्टे. कुंटूर, व्हि. डी. निकम बिट अंमलदार पो.स्टे. कुंटूर, महसुल पथक धम्मप्रिया गायकवाड, तहसिलदार नायगाव, व ईतर महसुल स्टॉफ यांनी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments