नांदेडराजकीय

The Muslim community of Himayatnagar united to make Baburao Kadam MLA..! : बाबुराव कदम यांना आमदार करण्यासाठी हिमायतनगरातील मुस्लिम समाज एकवटला..! -NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| लोकनेते तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना आमदार करण्यासाठी हिमायतनगरातील मुस्लिम समाज एकवटला असल्याचे बोलले जात आहे. शहरातील मुस्लिम मतदार असलेल्या वार्डात खुद्ध माजी उपनगरअध्यक्ष मोहम्मद जाविद यांनी पाच नगरसेवक प्रतिनिधींच्या सोबत पुढाकार घेऊन शहरात प्रचार राहिली काढली आहे.

हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत मागील काळात भ्रष्टाचाराच्या चौकशीचा मुद्दा हाताळणारे माजी उपनगरअध्यक्ष मोहम्मद जाविद हाजी अब्दुल गन्नी सेठ यांनी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना 5 माजी नगरसेवकासह शेकडो समर्थकांना घेऊन पाठिंबा दिला आहे. त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर प्रचारात उडी घेतली असून, शहरातील प्रत्येक मुस्लिम समाज बांधवांच्या मतदानाची संख्या असलेल्या वॉर्डावॉर्डात समर्थक मुस्लिम समाज बांधवाना घेऊन डोअर टू डोअर भेटी घेत बाबुराव कदम साहेबाना आमदार करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यांच्या या आवाहनाला सर्व समाज बांधवांचा प्रतिसाद मिळत आहे.

मागील नगरपंचायत सत्तेच्या काळात मा.उपनगरअध्यक्ष मोहम्मद जाविद यांच्यावर नगरपंचायतीच्या काळात दिलेले आश्वासन पाळले नसल्याने काँग्रेसच्या अडीच वर्षाचा नगराध्यक्ष निवडीच्या वेळी आपल्या समर्थक सदस्यांना घेऊन शिवसेनेला पाठिंबा देऊन शिवसेनेचा नगराध्यक्ष व स्वतः मोहम्मद जाविद हे उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झाले होते. तेंव्हापासून काँग्रेसच्या विरोधात त्यांनी काम सुरु केले आहे. त्यावेळी मंत्रालयातील विविध कामे मंजूर करण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यात बाबुराव कदम कोहळीकर यांनी सहकार्य केले होते.

ज्यांनी आपल्याया अडचणीच्या काळात सहकार्य केले त्यांना सहकार्य करणे आपले कर्त्यव्य आहे असे समजून विधानसभा निवडणुकीत मा.उपनगरअध्यक्ष मोहम्मद जाविद, अनवर खान पठाण माजी नगरसेवक प्रतिनिधी, सदाशिव सातव मा.नगरसेवक प्रतिनिधी, प्रभाकर मुधोळकर मा.नगरसेवक, अब्दुल खय्युम मा.नगरसेवक प्रतिनिधी यांनी सहकारी उदय देशपांडे राष्ट्रवादी कांग्रेस शहर अध्यक्ष हिमायतनगर, शेख फेरोज खुरेशी मा.अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष कांग्रेस, मोहम्मद जुनेद सेट, शेख सलीम खुरेशी मा.एम् आय एम् तालुका अध्यक्ष, जलील खुरेशी मा. ग्रा.प. सदस्य , मुखतार खान, मसूद खान, सय्यद आदिल आदींसह शेकोड़ोच्या संख्येत मुस्लिम समाज बांधवाणी बाबुराव कदम कोहळीकर याना पाठिंबा दिला आहे.

महायुतीचे उमेदवारास बाबुराव कदम कोहळीकर यांना निवडून आणण्यासाठी शेकडो समर्थकांना घेऊन माजी उपनगरअध्यक्ष मोहम्मद जाविद यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. हिमायतनगर शहरात काढलेल्या प्रचार रैलीला मुस्लिम समाज बांधवांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, महायुतीच्या जाहीरनाम्याचा प्रत देऊन बाबुराव कदम यांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळत असल्याने या निवडणुकीत बाबुराव कदम कोहळीकर विधानसभेत जाणार असल्याची प्रतिक्रिया हिमायतनगर नगरपंचायतीचे माजी उपनगरअध्यक्ष मोहम्मद जाविद मीडियाशी बोलताना व्यक्त केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button