Thursday, May 14

Chhatrapati Sambhajiraje : हदगावकरांनी पारंपरिक गुलामगिरी नाकारून देवरसकरांना एकदा संधी द्या – छत्रपती संभाजीराजे -NNL

नांदेड| हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी आता पारंपरिक राजकीय गुलामगिरी नाकारून नव्या नेतृत्वाला एकदा संधी द्यावी, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार माधवराव देवरसकर यांच्या प्रचार सभेत नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या सभेत देवरसकर यांच्या नेतृत्वात सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि हक्कांसाठी लढण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला.

IMG 20241112 WA0041 Chhatrapati Sambhajiraje : हदगावकरांनी पारंपरिक गुलामगिरी नाकारून देवरसकरांना एकदा संधी द्या – छत्रपती संभाजीराजे -NNL

संभाजीराजे म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांत पारंपरिक राजकारण्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयश आले आहे. आता बदल आवश्यक असून, शेतकरी व सामान्य नागरिकांनी नव्या नेतृत्वाला एकदा संधी द्यावी.” यावेळी उपस्थितांनी त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला.

IMG 20241112 WA0048 Chhatrapati Sambhajiraje : हदगावकरांनी पारंपरिक गुलामगिरी नाकारून देवरसकरांना एकदा संधी द्या – छत्रपती संभाजीराजे -NNL

माधवराव देवरसकर यांनी हदगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी झगडण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या लोकाभिमुख कार्यप्रणालीमुळे त्यांना स्थानिक नागरिकांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!