Homeनांदेडrecord breaking voting this time : नांदेड शहराला प्रशासनाने घातली साद यावेळी...

record breaking voting this time : नांदेड शहराला प्रशासनाने घातली साद यावेळी करा रेकॉर्डब्रेक मतदान – NNL

नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ 61 टक्के मतदान झाले होते. यावेळी ही टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढली पाहीजे यासाठी प्रशासन जोमाने कामाला लागले असून सर्वच स्तरातून प्रशासनाला प्रतिसाद मिळत आहे. आज महावीर चौकातील स्वीप अंतर्गत जाहीर कार्यक्रमामध्ये निवडणूक निरीक्षकांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. नांदेडकरांनी लोकशाहीच्या या पर्वात आपली जबाबदारी बहुसंख्येने पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

आज दि. 11 नोव्हेंबर रोजी 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान जनजागृती विशेष अभियान राबविण्यासाठी महावीर चौकात मनोरंजनासह प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी निवडणूक निरीक्षक श्रीमती बी. बालामाया देवी, श्रीमती पल्लवी आकृती, कालुराम रावत , शैलेंद्र कुमार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, नांदेड वाघाळा शहर महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, श्रीमती अनुष्का शर्मा, मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, मनपा उपायुक्त अजितपालसिंघ संधु, उपायुक्त संजय जाधव, सुप्रिया टवलारे, सहायक आयुक्त मिर्झा बेग, गुलाम सादिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना निष्पक्षपणे व कुठल्याही प्रलोभणाला बळी न पडता मतदान करण्याची शपथ दिली. याप्रसंगी भोकर येथील स्वीप कक्षाचे अधिकारी श्रीमती सुमन गोणारकर आणि सुधांशु कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार राजा आता तरी तू जागा हो! कणखर लोकशाहीचा तू मजबूत धागा हो! या आशयाचे पथनाट्याचे सादरीकरण करीत मतदार राजाला मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले. सादर करते समूहामध्ये सरस्वती कारले, सरस्वती जाधव, ज्योती पाटेकर, रूपाली कांबळे अनघा नरवाडे, वर्षा ढवळे, रेखा कांग्गठीकार, मनोरमा गोवंदे, रामेश्वर शिंदे, राजू सोनकांबळे, रंगराव कासराळे, प्रमोद फुलारी, गुलाब पावडे, साहेबराव डोंगरे यांचा समावेश होता.

WhatsApp Image 2024 11 11 at 8.13.01 PM record breaking voting this time : नांदेड शहराला प्रशासनाने घातली साद यावेळी करा रेकॉर्डब्रेक मतदान - NNL

या मतदारसंघातील कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते केंद्र सरकारकडून आलेल्या केंद्रिय सुचना कार्यालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयामार्फत जिल्ह्यात सुरु झालेल्या चलचित्र रथाचे उद्घाटन करण्यात आले. या रथाद्वारे मतदार संघातील शहरी आणि ग्रामीण भागात मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त मतदान होऊन लोकशाही बळकट होईल. यानिमित्त स्वीप कक्षाद्वारे सेल्फी पाँईंट उभा करण्यात आला होता यामध्ये महाविद्यालयातील तरुण मतदारांनी आणि इतर सामान्य नागरिकांनी सेल्फी काढून आपला सहभाग नोंदवला.

प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रापर्यंत पोहोचा
लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला महत्व आहे. आपला देश या लोकशाहीच्या आधारावर चालतो. पण मतदार राजा मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी थोडा निष्काळजी करतो. यावेळी आपल्या सर्वांना मिळून जास्तीत-जास्त मतदान करायचे आहे. काश्मीरसारख्या दुर्गम भागात आपल्यापेक्षा अधिक मतदान होते. यावेळी प्रत्येक नांदेडकरांनी मतदान करावे. आपले प्रत्येक मत हे आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाचे आहे, असे मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments