नवीन नांदेड l सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक कार्यात नेहमी उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे निखील देशमुख यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथील कार्यरत महिला पुरुष सफाई कामगार यांना साडी व ड्रेस वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
निखलेश देशमुख यांनी सिडको हडको परिसरात सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम राबविले आहेत, याही वर्षी सिडको क्षेत्रीय कार्यालये अंतर्गत साफसफाई महिला व पुरुष कामगारांना दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत साडी व ड्रेस वाटप करून मिठाई वाटप करण्यात आली.यावेळी आनंदा गायकवाड,किरण हाटकर,वैभव निलावाड,पवन शर्मा,मेघराज घुसे पाटील यांच्या सह निखलेश देशमुख मित्र मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.