HomeनांदेडNanded Lok Sabha :; सामाजिक कार्यकर्ते महारुद्र पोपळाईतकर नांदेड लोकसभा व नांदेड...

Nanded Lok Sabha :; सामाजिक कार्यकर्ते महारुद्र पोपळाईतकर नांदेड लोकसभा व नांदेड दक्षिण विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल – NNL

 नवीन नांदेड l नांदेड लोकसभा मतदारसंघ व दक्षिण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते महारूद्र हे केशवराव पोपळाईतकर यांनी काकांडी येथे आज दि. २८ आक्टोबर रोजी सत्याई देवी येथे नारळ फोडून आर्शीवाद घेऊन भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत नांदेड तहसिल कार्यालय येथे १ वाजता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व विधानसभा असे दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे, यावेळी नांदेड तहसिल कार्यालय येथे शेकडो समर्थकांच्या उपस्थित होते.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी साठी व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तरूण तडफदार व युवा नेते, म्हणून परिचित असलेले सामाजिक बांधिलकी जोपासणारे अपक्ष उमेदवार महारुद्र पोपळकाईतकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सामाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम राबविले आहेत.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व दक्षिण विधानसभा मतदारसंघा सह शहरी व ग्रामीण भागातील उत्साह पाहता नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातुन अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून या वेळी नांदेड दक्षीण मतदार संघातील अनेक गावांतील हजारो पुरुष यूवक समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते .

हि निवडणूक मोफत शिक्षण , मोफत आरोग्य, करमुक्त शेती, निर्भय पोलीस खाते या चार विषयावर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत या विषयावर शासनास दरबारी पोहचण्यासाठी झगडणारे यूवा नेतृत्व आहे. यावेळी उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उपस्थित दत्तराम पाटील बगल, डॉ दत्ता खोसे, येंकोबा रामराव सगर , मोतीराम ग्यानबा कोंके, नाना पाटील बगल, ज्ञानेश्वर कोंके, सुदाम कोंके, डॉ रामलाल राठोड, प्रताप पाटील चौधरी, तुलसीराम बालाजी मंदवाड, रघुनाथ केंद्र, येंकोबा रावसाहेब भवर, बालाजी काकांडीकर, सुशीलाबाई पातळ डॉ,महेश बालाजी पवार,हरी गणेश पवार,दत्ता पांडुरंग पवार, नीलेश प्रकाश बंडे,नारायण बींगेवाड, श्रीरंग बींगेवाड,विपीन वाघमारे,माधव केंद्र, काशिनाथ केंद्र,सचिन केंद्र,बालाजी पेरले,विश्वनाथ सागर,भद्री सगर,संजय पांडे, दिगंबर शेळके यांच्या सह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments