लोहा| विधानसभा मतदार संघात २६ व २७ तारखेला निवडणुकीचे पाहिले प्रशिक्षण पार पडले. विधानसभा व नांदेड लोकसभा या दोन्ही निवडणूक मतदान प्रकियेसाठी २ हजार १४६ कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे .मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान कर्मचारी असे १५० जण दोन दिवसाच्या प्रशिक्षणासाठी गैरहजर होते. त्या सर्वाना निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी तातडींच्या कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आल्या असून २४ तासात खुलासा करावा अन्यथा कार्यवाही करू असे लेखी कळविण्यात आले आहे.
लोहा विधानसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार याच्या उपस्थितीत २६ व२७ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह समोरील के के मंगल कार्यालयात कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण पार पडले .दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात सहायक निवडणूक अधिकरी तहसीलदार विठ्ठल परळीकर, निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे, सहायक निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यासह नायब तहसीलदार उपस्थित होते.कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले ते दुपार सत्रात नारायणा इंग्लिश स्कुल मध्ये ईव्हीएम प्रशिक्षण देण्यात आले.
मतदार संघातील निवडणूक प्रकियेसाठी २ हजार १४६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले यात पहिल्या दिवशी केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष असे ९१३ जणांना प्रशिक्षण देण्यात आले .यात केंद्राध्यक्ष(पीआरओ )३८, सहायक मतदान केंद्राध्यक्ष (आयपीओ) २५ असे एकूण ६३ कर्मचारी गैरहजर होते तर दुसऱ्या दिवशी रविवारी १हजार२३३ इतर मतदान कर्मचारी याना प्रशिक्षण देण्यात आले .यात ८७ ओपीओ कर्मचारी प्रशिक्षणासाठी दांडी मारली दोन्ही दिवसात १५० कर्मचारी अनुउपस्थित होते.यात बीएलओ , याचाही समावेश आहे.
या सर्व अनुउपस्थित कर्मचाऱ्यांना नोटीस बाजवण्यात आली त्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष /सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, इतर मतदान कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आले पण . त्याअनुषंगाने पहिल्या प्रशिक्षणास आपल्याला लेखी सुचना देण्यात आली होती. तरीही आपण सदरील प्रशिक्षणास गैरहजर होतात. त्यामुळे आपण निवडणूकीसारख्या अतिमहत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे सदर बाब अतिशय गंभिर स्वरुपाची आहे. आपल्या विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये कार्यवाही का करण्यात येवु नये या बाबीचा खुलासा समक्ष २४ तासाच्या आत सादर करावा अन्यथा आपले काही म्हणणे नाही असे गृहित धरुन आपले विरुध्द नमुद कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. असा आशयाची नोटीस बाजवण्यात आली आहे त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे.