Homeमुंबईupcoming assembly elections : आगामी विधानसभा निवडणूकांसाठी राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र -NNL

upcoming assembly elections : आगामी विधानसभा निवडणूकांसाठी राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र -NNL

मुंबई| आगामी विधानसभा निवडणूकांसाठी मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हयात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत केवळ १ शॅडो मतदान केंद्र असणार आहे.

राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र असतील. १२ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र नसतील. या शॅडो मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असणार आहेत. यामध्ये विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्हीएचएफ, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलीस विभागाचा रनर या शॅडो मतदान केंद्रात कार्यरत असतील. याशिवाय बीएसएनएलमार्फत पर्यायी कम्युनिकेशन यंत्रणाही कार्यरत असेल.

विधानसभा निवडणुकांसाठी जिल्हानिहाय शॅडो मतदान केंद्राची संख्या पुढीलप्रमाणे :

.क्र जिल्हयाचे नाव शॅडो मतदान केंद्राची संख्या
अहमदनगर २२
अमरावती ७३
औरंगाबाद ०९
बीड २२
भंडारा ०२
बुलढाणा ०७
चंद्रपूर ४१
धुळे १६
गडचिरोली ४९
१० गोंदिया ३३
११ जळगाव १६
१२ कोल्हापूर १७
१३ नागपूर ०४
१४ नांदेड १२
१५ नंदूरबार ६९
१६ नाशिक १०२
१७ पुणे ३८
१८ रायगड ४६
१९ रत्नागिरी २३२
२० सांगली ०१
२१ सातारा ३१
२२ सिंधुदुर्ग ६०
२३ वर्धा ०२
२४ यवतमाळ ११
एकूण ९१५

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments