नांदेड| ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नंबर 872/2024 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता अविनाश अशोक येडे रा. वैजाळा ता. पाटोदा जि.बीड, ह.मु. विष्णुपुरी ता.जि. नांदेड दिलेल्या गोपनीय माहिती वरुन गुन्हा घडला तारीख वेळ व ठीकाण दिनांक 25/09/2024 रोजी वेळ 20.00 वा ते दिनांक 26/09/2024 रोजी वेळ 08.30 वाजताचे दरम्यान एम.एस. ऑफीस समोरुन सरकारी दवाखाना परिसर विष्णुपुरी ता.जि. नांदेड येथून चोरीला गेली होती.
त्यावरून अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत मोटार सायकल चोरीचे दाखल असलेले गुन्हे उघड करण्याचे सर्व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पो. स्टे. नांदेड ग्रा. गुन्हे शोध पथकाचे महेश कोरे पोलीस उप निरीक्षक व त्याचे टिमने गुन्हयातील अज्ञात आरोपीचा व चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा शोध घेत गुप्तहेरांच्या मदतीने आरोपीतांना ताब्यात घेवुन चौकशी केली.
आरोपी क्रमांक १) सुजल पि. सर्जेराव देशमुख वय 19 वर्ष )व्यवसाय बेकार रा. मिरखेल ता. जि.परभणी, 2) मुकुंद गंगाधर करे वय 27 वर्ष व्यवसाय बेकार रा. पांढरगांव, ह. मु. खंडोबा बाजार परभणी, 3) क्रष्णा मारोती कुरधने वय 25 वर्ष व्यवसाय बेकार रा. तरोडा ता.जि.परभणी याचेकडून, एक बजाज पल्सर मोटार सायकल चेचीस क्र. MDXWND64478 किमती 80,000/- रु., एक बजाज पल्सर मोटार सायकल चेचीस क्र. MD2A11CX5NCD29988 किमती 60,000/- रु.एक होन्डा स्पेन्डर प्लस मोटार सायकल क्र. एम.एच.26 W-2427 किमती 20,000/- रु. एकुण 1.60.000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपीतांनी गुन्हयाची कबुली देवुन चोरी केलेल्या वरील वर्णनाच्या तीन मोटार सायकल किमती 1,60,000/- रुपये काढुन दिल्याने त्या जप्त करुन ताब्यात घेतल्या आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहेकॉ/124 गवळी हे करीत आहेत.
पोलीस अधिक्षक, अबिनाश कुमार, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव अप्पर पोलीस अधोक्षक नांदेड, कुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, सुशील यांचे मार्गदर्शनाखाली ओमकांत चिंचोलकर पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रा., महेश कोरे, पोलीस उप निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रा.,पोलीस अंमलदार सत्तार शेख, संतोष जाधव, विक्रम वाकडे, शंकर नलबे, माथव माने, शंकर माळगे, ज्ञानेश्वर कलंदर, मारोती पचलिंग, असीफ शेख. सुनिल गटलेवार, शिवानंद तेजबंद सर्व नेमणुक गुन्हे शोध पथक पो.स्टे. नांदेड ग्रा. यांनी हि कार्यवाही केली आहे.