नांदेडधार्मिक

Kakada Dindi was started : शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत हिमायतनगरात काकडा दिंडीला झाला प्रारंभ – NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या समाप्तीनंतर शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार हिमायतनगर (वाढोणा) शहरातील महिला – पुरुष वारकरी सांप्रदाईक भजनी मंडळाने शुक्रवारपासून काकडा दिंडीला प्रारंभ केला आहे. यामुळे शहरात सकाळच्या रामप्रहरी हरी नामाचे स्वर निनादू लागल्याने दिवाळीच्या पर्वकाळात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

शेकडो वर्षाच्या परंपरेने चालत आलेल्या रिती – रिवाजाप्रमाणे सकाळच्या प्रहरी टाळ – मृदंगाच्या वाणीत काकडा दिंडी काढून सर्व देवी देवतांचे दर्शन घेणाऱ्यास मोक्ष मिळतो. असा ग्रामीण भागातील नागरिकांचा समाज आहे. तीच परंपरा जोपासत शहरातील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर, महाकाली, कालीन्का देवी महिला व पुरुष भजनी मंडळाच्या वतीने काकडा दिंडी काढण्यात येते. त्या दिंडीला शुक्रवार दिनांक १८ पासून सुरूवात झाली असून, सदर दिंडी हि टाळ – मृदंग, आरती व भजन मंडळीच्या सानिध्यात काढली जाते. या दिंडीत नागरिकांसह अबाल वृद्ध व बालके सुद्धा हाती भगवा झेंडा घेऊन सहभागी होतात. तर गृहिणी सकाळच्या प्रहरी सडा सारवण करून घरासमोर रांगोळी काढून दिंडीचे स्वागत करतात.

IMG 20241018 064320 Kakada Dindi was started : शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत हिमायतनगरात काकडा दिंडीला झाला प्रारंभ - NNL

वारकरी संप्रदायाच्या महिला मंडळी श्री परमेश्वर, कालीन्का मंदिरात जाऊन काकडा आरतीत सहभागी होतात. यात विविध धार्मिक प्रकारची आरती गाऊन ग्रामस्थांना जागृत करीत आहेत. भक्तिगीतांच्या काकडा आरतीने व शहरातील मुख्य रस्त्यावरून घुमणाऱ्या दिंडीने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हा काकडा दिंडीचा कार्यक्रम जवळपास महिनाभर चालणार असून, गुलाबी थंडीत सकाळी अभ्यंगस्नान करून दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकरी, भक्त व बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे. सदर दिंडीचा समारोप कार्तिक पोर्णिमा समाप्तीच्या दिवशी शहरातील मुख्य रस्त्यावरून पालखी मिरवणूक काढून भव्य महाप्रसादाने केली जाणार आहे.

IMG 20241018 064129 Kakada Dindi was started : शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत हिमायतनगरात काकडा दिंडीला झाला प्रारंभ - NNL

सकाळच्या रामप्रहरी उठून फिरणे हे शरीरासाठी व आरोग्यासाठी लाभदायक आहे. म्हणूनच जुन्या लोकांनी दिंडीच्या प्रथेतून हि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जुन्या जाणकारातून सांगितले जाते. या दिंडीत शहरातील वारकरी संप्रदायाचे अनेक भजनी मंडळाचे कार्यकर्ते, महिला, बालक, युवक सामील होत असल्याने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहवयास मिळते आहे.

IMG 20241018 064357 Kakada Dindi was started : शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत हिमायतनगरात काकडा दिंडीला झाला प्रारंभ - NNL

हिमायतनगर शहरात शेकडो वर्षाच्या परंपरेने चालत आलेल्या रिती – रिवाजाप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या महिला – पुरुष भाविक भक्तांनी सकाळच्या प्रहरी टाळ – मृदंगाच्या वाणीत काकडा दिंडी काढून सर्व देवी देवतांचे दर्शन घेतात. हि दिंडी कार्तिक पौर्णिमेपर्यंत सकाळच्या प्रहरी दररोज शहरातील मुख्य रत्स्याने देवी देवतांचे दर्शन घेऊन येते हि परंपरा आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!