HomeनांदेडHadgaon ; हदगाव शहरात काही ठराविक प्रभागातच विकास कामे अनेक वार्ड नागरी...

Hadgaon ; हदगाव शहरात काही ठराविक प्रभागातच विकास कामे अनेक वार्ड नागरी सुविधा पासून वंचित – NNL

हदगाव, शेख चांदपाशा | हदगाव शहरात व तालुक्यात शासनाच्या विविध योजनेद्वारे करोडो रुपयाचा निधी विविध पक्षाचे लोकनेते, विद्यमान आमदार आणत असल्याचा सांगण्यात येते आहे. आणि विविध भागात उद्घाटनही झालेली आहेत. पण हदगाव शहरातील काही विशिष्ट प्रभागात नागरी सुविधा व विकासा पासून कोसो दूर आहे. गेल्या 10 दहा वर्ष हदगाव नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात असताना विद्यमान आमदार साहेबांनी किमान एकदा तरी अशा भागात फेरफटका मारला का ? असा प्रश्न आता विविध विकास कामाचे उदघाटन करणाऱ्या आमदारांना विकासाच्या प्रतीक्षेत असलेली जनता विचारण्याच्या तयारीत आहेत.

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नियोजन करण्यात आले अशी ओरड होत असताना मात्र त्याकडे कमालीचे दुर्लक्ष विद्यमान आमदार करीत आहेत. अशी उलट सुलट चर्चा हदगाव शहरासह तालुक्यात ऐकवायास मिळत आहे. कारण या बाबतीत स्थानिक माध्यमांना आमदार किंवा संबंधित प्रशासना कडून कोणती ही माहिती मिळत नाही. शहरातील जुन्या भागात गेल्या 20 ते 25 वर्षापासून रोड नाल्या नाहीत. करोडो रुपयांचा निधी नेमका कुठे टाकण्यात आला. याबाबत सखोल चौकशी केल्यास बरच काही उघडकीला येणार आहे. जिथे विकास कामे झाली त्या कामाचा बोर्ड लावणे आवश्यक असताना तसा बोर्ड ही बहुतांशी कामावर दिसून येत नाही.

आणलेला निधी नेमका राज्य शासनाचा की केंद्र शासनाचा…? असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलेला असून, हदगाव विधानसभा क्षेत्राचे आमदारांनी वर्षातून एकदा तरी शहरात फेरफटका मारायला हवा होता अशी नागरिकांची मागणी आहे. आढावा घेऊन शहरातील काही विशिष्ट भागात नागरी समस्या अध्याप सोडवण्यात आलेल्या नाहीत. त्या का सोडवण्यात आल्या नाहीत या बाबत भेदभाव झाला का..?याची चौकशी पण करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे. गेल्या गेल्या दहा वर्षा पासून हदगाव नगर परिषद वर काँग्रेसच्या माध्यमातून विद्यमान आमदारांची एक हाती सत्ता होती. त्यांच्याच विश्वासातील काही नगरसेवकांनी आपलाच प्रभागात पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नियोजन केल्याच्या स्पष्ट जाणवत आहे.

बाकीच्या प्रभागात कोणतेही काम झालेले नाही जिथे झालेले आहे, तिथे त्या कामाचा दर्जा पाहिल्यानंतर लगेच लक्षात येते की, सदर काम कोणीतरी कंत्राटदाराच्या नावावर भलत्याच व्यक्तीने केलेले असल्याचे दिसून येते. केवळ सुमार दर्जाचे कामे करून बील उचलण्यात आलेली आहेत. शहरात जुन्या भागात गेल्या दोन दशका पासून रोड नाली पाण्याच प्रश्न जैसे थे आहे. या बाबतीत अनेक वेळा संबंधित तात्कालीन नगरसेवक व नगराध्यक्ष विद्यमान आमदारांना विविध माध्यमातून इथल्या नागरिकांनी निदर्शनास आणून दिले होते. पण त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. लोकसभेच्या निवडणुका झालेले आहेत, विविध राजकीय पक्षांच्या नेते करोड रुपयाचा निधी उपलब्ध झाल्याचे सांगण्यात येतो. मात्र शहरातील अद्यापही काही भागात नरक पुरीचे जीवन जगणाऱ्या हदगाव शहरातील काही विशिष्ट भागाकडे का..? दुर्लक्ष झाले आहे असा संतप्त सवाल ही नागरिक करित असताना दिसून येतात.

विशेष म्हणजे या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी अद्यापही पुरेसे मिळत नाही. अद्यापही रोड नाली चे काम करण्यात आलेच नाही. रोडच्या बाजूला नाल्या पण नाहीत. यामुळे रस्त्यात खड्डे पडलेले आहेत रोड नाल्यांच काम न झाल्यामुळे सांडपाणी रोडवर येत असल्याने, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हदगाव शहरातील जुन्या भागातील मुख्य रोडवर साधे पैदल चालने पण कठीण झालेले आहे, हे आवर्जून उल्लेख करावा लागेल. किमान आतातरी विद्यमान आमदाराणी हदगाव शहरातील विकासापासून वंचित असलेल्या प्रभागात फेरपताका मारून जनतेच्या समस्या सोडवाव्या नाहीतर याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून येईल असेहि विकासाच्या प्रतीक्षेत असलेली जनता खाजगीत बोलून दाखवीत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments