HomeनांदेडAnnouncement of Independent Welfare Corporation : पत्रकार व वृतपत्र विक्रेता साठी शासनाने...

Announcement of Independent Welfare Corporation : पत्रकार व वृतपत्र विक्रेता साठी शासनाने स्वतंत्र कल्याणारी महामंडळाच्यी घोषणा -NNL

नांदेड| महाराष्ट्र शासनाने वृत्तपत्र विक्रेता व पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणारी महामंडळाच्यी घोषणा १० ऑक्टोबर रोजी विशेष कॅबिनेट बैठक मध्ये मंजुरी देऊन स्वतंत्र कल्याणकारी मंडळ घोषणा केल्याबदल नांदेड जिल्हा वृतपत्र विक्रेता शाखा सिडको वृतपत्र विक्रेता टिनशेड येथे ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता मिठाई वाटप करून फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये या निर्णयाचे स्वागत करून जल्लोष व्यक्त करण्यात आला यावेळी पत्रकार व वृतपत्र विक्रेता मोठया संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ,अजित पवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत १० ऑक्टोबर रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्री मंडळ बैठकीत पत्रकार व वृतपत्र विक्रेता साठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना घोषणा केली. या निर्णयाचे स्वागत करून ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता नांदेड जिल्हा वृतपत्र विक्रेता संघटनेच्या सिडको शाखा वृतपत्र. विक्रेता टिनशेड येथे प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, माजी राष्ट्रपती कै. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी उपस्थित नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, किरण देशमुख, अनिल धमणे, तिरूपती पाटील घोगरे, सारंग नेरलकर, व लोकमत वितरण सुधारक काकडे,गणेश डोळस, वृतपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सतिश कदम, बालाजी सुताडे, दिलीप ठाकूर, महिला वितरक वंदना लोणे, जेष्ठ विक्रते शेख सयोधदीन,दौलतराव कदम, रामनाथ दमकोडवार,तातेराव वाघमारे,अमोल नांदेडकर, राम धांवडे,गजानन धांवडे, बालाजी दमकोडवार,अनिल धांवडे, साहेबराव डोईबळे,महेश सुताडे, गणेशे ठाकूर,गणेश कांबळे, साईनाथ गोटमवार यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वृतपत्र विक्रेता संघटनेच्या जयघोष करत एकमेकांना मिठाई वाटप करण्यात आली व शासनाचे आभार मानले व टिनशेड परिसरात फटाक्यांची आतिषबाजी व ढोलीत गजर करण्यात आला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments