नांदेडधार्मिक

Chief Minister’s Tirtha Darshan Yojana : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यात्रेच्या नियोजनात अंशत: बदल -NNL

नांदेड| मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांची पहिली रेल्वे 12 ऑक्टोबर रोजी नांदेड येथून अयोध्या धामला जाण्यासाठी निघणार होती. परंतु या नियोजनात अंशत: बदल होवून ही रेल्वे आता 23 ऑक्टोबर 2024 रोजी रवाना होणार आहे. या योजनेतील अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी या सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत त्यांना राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनाने सुरु केली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत यापूर्वी 12 ऑक्टोबर 2024 रोजी पहिली ट्रेन नांदेड येथून अयोध्या धाम येथे नियोजित होती. परंतु समाज कल्याण आयुक्त पुणे यांचे निर्देश व इंडियन रेल्वे ॲन्ड केटरींग ॲन्ड टूरीझम कॉपोरेशन लि. यांचे सुधारित वेळापत्रकानुसार या यात्रेच्या नियोजनात अंशत: बदल करुन आता ही यात्रा 23 ऑक्टोबर 2024 रोजी धाम येथे जाणार आहे.

राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यामिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत, त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घेवून 23 आक्टोंबर 2024 रोजी पहिली ट्रेन नांदेड येथून अयोध्या धाम येथे निघणार असून 28 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्या धाम येथून परत येणार आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button