HomeकरियरYuva gramin reporter union ; युवा ग्रामिण पञकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी अनिल...

Yuva gramin reporter union ; युवा ग्रामिण पञकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी अनिल माडपेलीवार यांची सर्वानुमते निवड -NNL

श्रीक्षेञ माहूर। संपुर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी सातत्याने झगडणाऱ्या,युवा ग्रामिण पञकार संघाच्या माहूर तालुका अध्यक्षपदी अनिल माडपेलीवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या निवडीवेळी जिल्हा व तालुका संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थीत होते. 

तळागळातील पञकारांना व संघटनेतील नवीन सदस्यांना संधी मिळावी,या उद्देशाने युवा ग्रामीण पत्रकार संघटना प्रयत्न करत असते.त्याचाच हा भाग म्हणून दि.६ ऑक्टोंबर २०२४ रोजी येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली.यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य कार्तिक बेहेरे,जिल्हा उपाध्यक्ष राजू दराडे, मार्गदर्शक व सल्लागार म्हणून विनोद कांबळे सर,गोपाल खापर्डे, समाधान कांबळे, आदेश बेहेरे, गोपाल नाईक, रफिक शेख, ईसा सय्यद, प्रवीण बर्डे, सोनू राठोड  व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माडपेलीवार यांनी आपल्या आभार प्रदर्शनातून येणाऱ्या काळात मी नित्यनियमाने या युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या वाटचालीतून सर्वांचा विश्वास संपादन करत माहूर तालुक्यातील सर्व पत्रकारांना पाठबळ देवून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहीन असा विश्वास त्यांनी यासंबंधाने व्यक्त केला.त्यांच्या या निवडीने माहुर तालुक्यातील राजकिय व मिञ परिवाराकडू त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments