Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा

February 10, 2026

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
  • Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - P.P.Wawa : सफाई कर्मचाऱ्याना कायदेशीर सर्व सोयी -सुविधा पुरवा : पी.पी.वावा -NNL
नांदेड महाराष्ट्र October 7, 2024

P.P.Wawa : सफाई कर्मचाऱ्याना कायदेशीर सर्व सोयी -सुविधा पुरवा : पी.पी.वावा -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 7, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| सफाई कामगारांसंदर्भात असणारे कायदे, त्यांच्या सुविधा, शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणारे निर्देश यांचे काटेकोर पालन नांदेड महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झाले पाहिजे. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी अधिनस्त अधिकाऱ्यांना संबधित कायद्याचे पालन करण्याचे निर्देश द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत नांदेड महानगरपालिकेतील व जिल्ह्यातील इतर नगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीचा आढावा आयोगाच्या सदस्यांनी घेतला. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपआयुक्त कारभारी दिवेकर, जिल्हा प्रशासन अधिकारी गंगाधर ईरलोड, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, शहर अभियंता सुमंत पाटील तसेच जिल्ह्यातील इतर नगरपालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम राष्ट्रीय कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा यांचे व त्यांच्या सहकारी वर्गाचे मनपा आयुक्तांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीस मनपाचे उपआयुक्त कारभारी दिवेकर यांनी महानगरपालिकेतील कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सादरीकरण केले. ज्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात एकूण ०६ झोन असून त्यातील २० प्रभागामध्ये संपूर्ण शहराच्या साफ-सफाईचे कामे कायम व कंत्राटदारामार्फत नेमलेल्या सफाई कामगारांमार्फत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची एकूण मंजुर पदसंख्या ८०५ असुन त्यापैकी आजमितीस ५३१ कायम कामगार कार्यरत आहेत. तर २७४ कायम सफाई कागारांची पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे कंत्राटदारामार्फत एकुण ४०६ सफाई कर्मचारी कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महानगरपालिकेत महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना वारसा हक्काने नियुक्त्या दिल्या जातात. तसेच मनपा आस्थापनेवर स्थापनेपासून सफाई कर्मचाऱ्यांना वाहन चालक, लिपीक, इत्यादी गट-क मधील पदावर पदोन्नत्या देण्यात येत असतात मागील दोन वर्षाच्या कालावधीत्त एकूण ५५ सफाई कामगारांना पदोन्नती देण्यात आल्याचे यावेळी उप आयुक्तांनी सांगितले.

महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करुन आरोग्य विषयक तपासण्या करुन उपचार केल्या जातात. तसेच महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना मास्क, हँडग्लोज, एप्रॉन, नाली फावडा, टोपले, नारळी झाडु, रेनकोट, गमबुट इत्यादी स्वच्छता विषयक साहित्य देण्यात येते. त्याचप्रमाणे ड्रेनेज विभागा अंतर्गत वॉटरप्रुफ बुट, रिचार्जेबल बॅटरी, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी ग्लोज, सर्च लाईट, सेफ्टी गमबुट, नायलॉन लॉडर, नॉर्मल फेस मास्क, सेफ्टी हेल्मेट इत्यादी साहित्य पुरविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात सफाई आयोगाच्या सदस्यांनी विचारणा केली असता कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदाई केल्या जात आहे. तसेच ईपीएफ व इएसआयसी, ५ टक्के घरभाडे भत्ता अदाई करण्यात येत असल्याचे मनपा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. तसेच सफाई कामगारांना सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला सुध्दा दिल्या जातो असे नमुद करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम-साफल्य योजने अंतर्गत ८१ सफाई कामागारांना मोफत सदनिकेचा ताबा दिला असल्याचे यावेळी मनपाच्यावतीने सांगण्यात आले.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांनी यावेळी कामगार नेत्यांनाही आपली भुमिका मांडण्याचे आवाहन केल्यानंतर महापालिका कर्मचारी युनियनचे संस्थापक अध्यक्ष कॉ.गणेश शिंगे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. तसेच सफाई कामगारांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापण करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मनपा आयुक्तांना या विषयात लक्ष घालण्याचे निर्देश दिले. एकंदरीत बैठकीच्या समारोपास आयोगाच्या सदस्यांनी महानगरपालिकेच्या कामावर समाधान व्यक्त करुन बैठकीची सांगता करण्यात आली. बैठक संपल्यानंतर आयोगाच्या सदस्यांना जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सुद्धा भेट दिली. या बैठकीचे सुत्रसंचालन मनपाच्या जनसंपर्क विभागाचे सुमेध बनसोडे यांनी तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले.

P.P.Wawa Provide all legal facilities to sanitation workers
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCollector : शासकीय जमिनीवर बेकायदेशीर ताबा दाखवाल तर गंभीर कारवाई करू : जिल्हाधिकारी -NNL
Next Article Deshmukh S M ; श्री.एस.एम.देशमुख सर असणार पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाचे उद्घाटक -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Journalism Awards 2024 : राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन – NNL

January 13, 2025

Sudhir Bhalchandra Khodve : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर भालचंद्र खोडवे यांचे उत्कृष्ट कार्य -NNL

December 30, 2024

९ सप्टेंबर सोमवारी पूरग्रस्तांचा महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सामूहिक अर्ज भरणार – कॉ.गंगाधर गायकवाड -NNL

September 5, 2024

Kalvat Phula ; मांडवी, गणेशपुर, कोठारी (सिं), जमुनानगर मार्गावरील कलवट फुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

February 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Hivatap : सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर

Successful students ; विद्यापीठातील यशस्वी विद्यार्थ्यांचा कुलगुरूंच्या हस्ते होणार सत्कार – NNL

Appeal to take advantage : इतर मागासवर्गीय महामंडळाच्या विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन -NNL

Tejomay Pratishthan’s Sangeet Vasant Mahotsav : राज्यस्तरीय गायन स्पर्धा व संगीत मैफलीने तेजोमय प्रतिष्ठानचा संगीत वसंत महोत्सव दिमाखात संपन्न -NNL

Police omkant chincholkar ; ओमकांत चिचोलकर यांनी पदभार घेताच ग्रामीण पोलीस ठाण्यात तंटामुक्त समितीसह, ग्राम रक्षक दल व व्यसन मुक्ती गाव समिती स्थापन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा

February 10, 2026

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?