Homeक्राईमCollecter abhijit raut ; लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करा...

Collecter abhijit raut ; लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करा – जिल्हाधिकाऱ्यांचे पोलिसांना निर्देश – NNL

नांदेड, गोविंद मुंडकर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेतील पैसे दुसऱ्याच पुरुषांचे आधार कार्ड व बँक अकाउंट वापरून फसवणूक करणाऱ्या सीएससी केंद्रचालकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. सोबतच अशा प्रकारची कुठे फसवणूक झाली तर नाही ना याबाबतही चौकशी करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत.

नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यातील मनाठा गावात ही फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या लोकप्रिय योजनेतील महिलांच्या हक्काचे पैसे पुरूषांच्या आधार लिंक असणाऱ्या खात्यावर परस्पर लाटल्याचा प्रकार जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा या ठिकाणी उघडकीस आला आहे.

मनाठा येथील सचिन सीएससी सेंटर या सीएससी सेंटरच्या चालकाने महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेताना इतर पुरूषांकडून आधारकार्ड व ते लिंक असणारे बँक अकाऊंट अपलोड केले.पुरूषांच्या आधार कार्डवर महिलांचे फोटो बनावट पद्धतीने अपलोड केले. महिलांचे नाव व आधारकार्डवर महिलांचे फोटो असल्यामुळे छाननीमध्ये सदरचा अर्ज महिलांनीच भरलेला आहे असे दिसून आले .परंतु आधार क्रमांक व त्याला लिंक असलेल्या बँक खाते हे इतर पुरुषांचे होते. त्यामुळे महिलांच्या खातात जमा होणारा पैसा या पुरुषांच्या खात्यावर आला.

ज्यांच्या खात्यात हे पैसे आले त्या पुरूषांनाही याची कल्पना नव्हती. नंतर त्यांचा अंगठा घेऊन सदरचा पैसा काढून घेण्याचा प्रयत्न सदरच्या सीएससी केंद्र चालकाने केला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकारानंतर सदरच्या केंद्रचालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे इतरत्र कुठे गडबड करण्यात आलेली आहे का..? याबाबतही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. महिला लाभार्थ्यांचे नाव व फोटो वापरून अशाप्रकारे बनवाबनवी करणाऱ्या या केंद्रचालकांवरती कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments