HomeतेलंगणाPurna karimnagar trean ; औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद...

Purna karimnagar trean ; औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर -NNL

नांदेड। औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने पुणे – करीमनगर – पुणे विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर केल्या आहेत.

पुणे – करीमनगर साप्ताहिक विशेष गाडीच्या 04 फेऱ्या : गाडी क्रमांक 01451 पुणे–करीमनगर विशेष गाडी दिनांक 21 आणि 28 ऑक्टोबर रोजी व 04 आणि 11 नोव्हेंबर, 2024 रोजी दर सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री 22.45 वाजता सुटेल आणि दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, अंकाई, रोटेगाव, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्तरकुंड, बोधडी, किनवट, आदिलाबाद, माजरी, चंद्रपूर, बलारशा, सिरपुरकागजनगर, मंचिर्याल, रामागुंडम, पेडपल्ली मार्गे करीमनगर येथे बुधवारी सकाळी 02.00 वाजता पोहोचेल. ही गाडी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, 2024 महिन्यात मिळून 04 फेऱ्या पूर्ण करेल.

करीमनगर – पुणे साप्ताहिक विशेष गाडीच्या 04 फेऱ्या : गाडी क्रमांक 01452 करीमनगर- पुणे विशेष गाडी दिनांक 23 आणि 30 ऑक्टोबर रोजी व 06 आणि 13 नोव्हेंबर, 2024 रोजी दर बुधवारी करीमनगर रेल्वे स्थानकावरून सकाळी 06.00 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच पुणे येथे गुरुवारी सकाळी 09.45 वाजता पोहोचेल. ही गाडी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, 2024 महिन्यात मिळून 04 फेऱ्या पूर्ण करेल. या गाडीत वातानुकूलित, स्लीपर आणि जनरल मिळून 18 डब्बे असतील. अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने जारी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments