नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन येथील श्री गणेश मुर्तीचे ढोलताशांच्या गजरात गुलाब पुष्प उधळून मिरवणूक काढून दहाव्या दिवशी झरी खदान येथे विसर्जन करण्यात आले.
ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गणेश चतुर्थीला ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या हस्ते विधीवत पुजन करून स्थापना करण्यात आली तर दैनंदिन आरती महाप्रसाद आयोजित करण्यात आले होते, दहा दिवसांच्या काळात भक्ती मय वातावरण मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.रेखा काळे, उपनिरीक्षक महेश कोरे भोसले,ज्ञानेश्वर मठवाड यांच्या सह महिला पोलीस कर्मचारी,पोलीस अंमलदार, होमगार्ड यांनी सेवा केली तर दव्हाया दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आल्यानंतर श्री विसर्जन मिरवणुक काढण्यात आली.
ग्रामीण पोलीस स्टेशन ते विसर्जन मिरवणूक दरम्यान फेटा बांधलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी गुलाब पुषप उधळून करून ढोलताशांच्या गजरात नाचुन आंनद व्यक्त केला, यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, घोषणांनी परिसर दणाणून गेला. पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या सह सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक सौ. रेखा काळे, सचिन गढवे,यांचा सह अधिकारी पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पत्रकार रमेश ठाकूर,किरण देशमुख,अनिल धमणे, सारंग नेरलकर, शिवाजी राजूरकर यांनी श्री मिरवणूक मध्ये सहभाग घेतला.