Wednesday, May 13

Nature and Cultivation Cleanliness : स्‍वभाव व संस्‍कार स्‍वच्‍छता: शाश्‍वत स्‍वच्‍छतेची गुरुकिल्‍ली -NNL

दिनांक 17 सप्‍टेंबर 2024 ते 2 ऑक्‍टोबर 2024 या कालावधीत स्‍वच्‍छतेसाठी देशभर स्‍वच्‍छता ही सेवा 2024 हा पंधरवडा राबविण्‍यात येणार आहे. स्‍वभाव स्‍वच्‍छता, संस्‍कार स्‍वच्‍छता ही यावेळची थीम आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्‍हा परिषदेचे मिलिंद व्‍यवहारे यांचा लेख प्रकाशीत करत आहोत.

नागरिकांचे आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी केंद्र व राज्‍य शासन स्‍वच्‍छते विषयी विविध योजना व उपक्रम ग्रामीण व नागरी भागात राबवित असते. गेल्‍या दहा वर्षापासून स्‍वच्‍छता ही सेवा हा पंधरवडा मोहिम स्‍वरुपात घेण्‍यात येतो. यावर्षीही दिनांक 17 सप्‍टेंबर 2024 ते 2 ऑक्‍टोबर 2024 या कालावधीत स्‍वच्‍छता ही सेवा 2024 हा पंधरवडा राबविण्‍यात येणार आहे. स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता या संकल्पना घेऊन राज्यभरात स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून यामध्ये स्वयंरफुर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे. या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करून सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यवसायिक व बाजाजपेठे, सार्वजनिक वाहतुक केंद्रे, पमुख रस्ते आणि महामार्ग, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे, प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तु, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले, सार्वजनिक शौचालय, स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत विविध घटकांचे नुतनीकरण करणे आर्दी सार्वजनिक ठिकाणी शहरी व ग्रामीण भागात संयुक्त मोहिम राबविण्यात येणार आहे.

या पंधरवडयात स्वच्छता की भागीदारीमध्‍ये लोकसहभागातून स्‍वच्‍छता, या विषयाची जनजागृती केली जाईल. गाव व परिसरातील अस्‍वच्‍छ ठिकाणे स्‍वच्‍छ करणे या मोहिमेचे प्रमुख उदिष्‍ट आहे. या ठिकाणावर लक्ष केंद्रीत करुन अशी ठिकाणे स्‍वच्‍छ करुन ती कायम स्‍वच्‍छ राहतील यासाठी स्‍थांनिक स्‍वराज्‍य संस्‍था, व्‍यक्‍ती व स्‍वंयसेवी संस्‍था यांना जबाबदारी देण्‍यात येणार आहे. विशेष: सफाई कामगारांसाठी आरोग्‍य शि‍बीर घेवून त्‍यांच्‍या आरोग्‍याची तपासणी करण्‍यात येणार आहे. तसेच त्‍यांना केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध योजनेची माहिती एकाच छताखाली देवून त्‍यांना लाभ देण्‍यासाठी अर्ज भरुन घेतला जाणार आहे.

स्वच्छता की भागीदारी या घटकांतर्गत उपक्रमाचे सुक्ष्म नियोजन करणे, वर्तणुक बदल य मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग असणे आवश्यक आहे. नाविण्यपुर्ण दृष्टीकोन समोर ठेऊन अंमलबजावणी करावयाची आहे. त्या अनुषंगाने स्वच्छता प्रतिज्ञा, सार्वजनिक वर्कशॉप, मॅरेथॉन, सायकल मॅरेथॉन, मानवी साखळी, ग्रामसभा, युवकांचा सहभाग, टाकाऊ वस्तुपासुन टिकाऊ वस्तु तयार करण्याचे कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत विविध घटकांचे नुतनीकरण, विविध स्पर्धा, विविध खेळ, गृहभेटीद्वारे जनजागृती, एक झाड आईच्या नावे, उपक्रम राबविण्यात यावे.

स्वच्छ फुड स्वच्छ गल्ली उपक्रमातून खाऊ गल्लीमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने मोहिम राबविणे, त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करुन शास्त्रयुक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर व्यवसायिकांना कचरा व्यवस्थापन करण्याबाबत जनजागृती केली जाईल. तसेच सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करणे, सदरील उपक्रमामध्ये लोकसहभागाच्या माध्यमातून अंमलबजावणी केली जाईल. या पंधरवडयात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्‍यावा. यामध्ये सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यवसायिक व बाजाजपेठे, सार्वजनिक वाहतुक केंद्रे, पमुख रस्ते आणि महामार्ग, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे, प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले, सार्वजनिक शौचालय आदीं ठिकाणी स्‍वच्‍छता करावी.

स्थानिक पातळीवरील सार्वजनिक अस्वच्छ ठिकाणांची (जे ठिकाण पर्यावरण, आरोग्यसाठी धोकादागक आहेत अशी) निवड करण्यात यावी. निवड करण्यात आलेल्या ठिकाणांची लोकसहभागाच्या माध्यमातून स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी. सदर ठिकाणी नियमित स्वच्छता राहिल यासाठी स्थानिक लोकांची जनजागृती करणे अपेक्षीत आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्त्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा करण्यात यावा. यामध्ये स्वच्छता करण्यात आलेल्या सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करणे, सफाईमित्राचा सत्कार करणे, स्वच्छता हि सेवा-2024 मध्ये उत्कृष्ट केलेल्या कामगिरी बाबत सत्कार, स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत सार्वजनिक शौचालय, घनकचरा वर्गीकरण केंद्र, सांडपाणी प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प यांचे उद्घाटन आदी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. नांदेड जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत व विविध सामाजिक संस्थांच्‍या सहभागाने नांदेड जिल्‍हयातही जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमातून समाजात स्वच्छतेचे आदर्श घालून देण्याचे काम केले जाईल. हा पंधरवडा आपल्या विचारसरणी आणि जीवनशैलीत शाश्वत बदल घडविण्याचा उत्तम संधी आहे. स्वभाव आणि संस्कारांची स्वच्छता राखली तर बाह्य स्वच्छता आपोआपच प्रभावी ठरते.

IMG 20240915 221533 Nature and Cultivation Cleanliness : स्‍वभाव व संस्‍कार स्‍वच्‍छता: शाश्‍वत स्‍वच्‍छतेची गुरुकिल्‍ली -NNL

…..लेखक – मिलिंद व्‍यवहारे, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!