Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - महाराष्ट्र - Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL
महाराष्ट्र September 15, 2024

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 15, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

धाराशिव| मला मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा वाटतो. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळत आहे. त्यांच्या डोळ्यातील हा आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. ही योजना ‘सुपरहिट’ ठरल्याचे यातून स्पष्ट होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. परंडा येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, महिला सक्षम तर देश सक्षम हे ब्रीद लक्षात घेवून राज्य शासन मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण ही योजना प्रभावीपणे राबवत आहे. या योजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा झाली असून त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्याकडून मिळणारे प्रेम पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळत आहे. लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद असाच कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य शासनाच्या इतरही योजना यापुढेही सुरु राहतील. लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे असे सांगून या योजनांसाठी निधीची तरतूदही शासनाने केली असून भविष्यात या योजनेचा लाभ टप्प्या-टप्प्याने वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे मला गरिबीची जाणीव आहे. गरीब कुटुंबातील महिलांच्या दृष्टीने दीड हजार रुपयांचे मूल्य खूप मोठे आहे, हे अनेकांना माहित नाही. नुकतीच माझी भेट झाल्यानंतर प्रणाली बारड या बहिणीने मला सांगितले की, दीड हजार रुपयातून तिने घुंगरू कडीचा व्यवसाय सुरु केला. गौरी गणपतीच्या सणात तिला या व्यवसायातून दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. याचप्रकारे इतरही भगिनींनी मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे आपापल्या परीने विविध व्यवसायात गुंतविले आहेत. त्यातून त्यांच्या व्यवसायाला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर तोट्यातील एसटी महामंडळ नफ्यात आले. त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमुळेही राज्य शासनाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना एका वर्षात तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेवून त्यांच्या शिक्षणाला पाठबळ दिले आहे. मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षांपर्यंत तिच्या बँक खात्यात टप्प्या-टप्प्याने एक लाख रुपये जमा करण्यासाठी ‘लेक लाडकी’ योजना सुरु केली आहे. लाडक्या बहिणींसोबत लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करून त्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या प्रशिक्षणार्थींना राज्य शासन दरमहा सहा ते दहा हजार रुपये विद्यावेतन देणार आहे. अशी योजना राबविणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध
शेतकऱ्यांसाठीही राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना सुरु करून देशात पहिल्यांदाच राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच शेतकऱ्यांना केवळ एक रुपये विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ दिला असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले. तसेच केंद्र शासनाने कांद्यावरील किमान निर्यात शुल्क रद्द करण्याचा आणि खाद्यतेलावर आयात शुल्क वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला दर मिळण्यास मदत होणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले.

उजनी धरणातून सीना-कोळेगाव प्रकल्पात पाणी आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी येत्या पंधरा दिवसात बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले. परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकामध्ये पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मागील दोन वर्षात नागरिकांना पुरविण्यात आलेल्या आरोग्य सुविधांचा लेखाजोखा मांडला. गतवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारकऱ्यांना पुरविलेल्या आरोग्य सुविधांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे. याशिवाय आरोग्य विभागाने राबविलेल्या माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित आणि जागरूक पालक सुरक्षित बालक या अभियानांमुळे राज्यातील मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील १२ कोटी ६५ लाखापेक्षा अधिक नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच दिले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून साडेअकरा हजार युवक-युवतींना सेवेत घेण्यात आले आहे. बदली प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी पहिल्यांदाच ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून याद्वारे अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्यांची कार्यवाही केल्याचे डॉ. सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसह इतर योजनांच्या महिला लाभार्थ्यांना यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात धनादेश आणि निवड पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पारंपरिक वेशभूषेत आलेल्या सिंधू पवार आणि पूजा पवार या बंजारा समाजातील भगिनींनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली.

प्रारंभी लाडक्या बहिणींचे स्वागत स्वीकारत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. यावेळी अनेक बहिणींनी त्यांना राखी बांधली. तसेच काही महिलांनी त्यांच्यासोबत मोबाईलवर सेल्फी घेण्याचा आग्रह केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः महिलांच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढून देत आपल्या लाडक्या बहिणींचा मान राखला. मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि पालकमंत्री डॉ. सावंत यांनी लाडक्या बहिणींवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि कवड्याची माळ, श्री विठ्ठल मूर्ती, वीणा व घोंगडी देवून यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी केले. आभार जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती.

Chief Minister - Majhi Ladki Bahin Yojana 'Superhit' Chief Minister Eknath Shinde
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleYouth Festival : १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान ‘सहयोग’ मध्ये होणार ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव -NNL
Next Article Sarpanch of Panshevadi : पानशेवडी च्या सरपंच पदी श्रीमती उज्वलाबाई मोरे यांची बिनविरोध निवड -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Himayatnagar : हिमायतनगरात बॅनरबाजीचे उच्छाद… उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन

Himayatnagar News : हिमायतनगरात महावितरणच्या अनधिकृत कामकाजावर प्रशासनाची धडक कारवाई

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Rajiv Gandhi ; राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या ई -ऑफिस प्रणालीला दुसरा क्रमांक

April 23, 2025

Dr Sangeeta Deshmukh ; नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. नागरिकांनी घाबरू नये – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख

June 2, 2025

Addiction free village campaign started : व्यसनमुक्त गाव मोहिम नर्सी नामदेव येथून हिंगोली जिल्ह्यातील कामकाजास प्रारंभ -NNL

October 12, 2024

smuggling illegal foreign liquor : विशेष पथकाने अवैध विदेशी दारूची चोरटी वाहतुक करणाऱ्या 3 आरोपीस घेतले ताब्यात -NNL

October 1, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Swami Ramanand Tirtha University | विद्यापीठातील मैदानाचा उपयोग भावी पोलिसांनी घ्यावा – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

case has been registered against five persons : आनंदनगर भागात झालेल्या युवकाचा खून प्रकरणी विमानतळ ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

New Superintendent of Police Abinash Kumar : गुन्हेगार हद्दपारीसाठी ‘ऑपरेशन वॉशआऊट’ – नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

Ambadi Grampanchayat Lock Down ; मासिकसभा सुरु असताना सरपंचबाईचे पलायन… संतापलेल्या ग्रामस्थांनी अंबाडी ग्रा.प. कार्यालयाला ठोकले टाळे

national highway | हिमायतनगर शहराजवळ राष्ट्रीय महामार्गाचा साईड पट्टीचा डांबरी रस्ता महिनाभरातच खचला – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?