नांदेडमहाराष्ट्र

Huyatma smarak development ; नांदेड जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांचा विकासासाठी शासनाचं उदासीन धोरण -NNL

नांदेड। जिल्ह्यातील मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील शासनाने स्वतंत्र सैनिकाच्या सन्मानार्थ उभारलेल्या स्मारकांची दुरुस्ती सुशोभीकरण करून स्मारकांचा विकास अमृत महोत्सवी वर्षात करण्याची मागणी स्वातंत्र्यसैनिक उत्तरअधिकारी केदार पाटील साळुंके यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लेखी देऊन चर्चा केली होती.

त्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांना बोलावून सर्वच स्मारकांचा विकास करण्याच्या सूचना वजा आदेश दिलेले होते मात्र अमृत महोत्सवी वर्ष संपले तरी विकास झाला नसल्याच्या निषेधार्थ 17 सप्टेंबर हा मुक्ती संग्राम दिन स्वातंत्र्यसैनिक उत्तरअधिकारी हे काळ्याफिती लावून साजरा करून शासनाचा निषेध नोंदवणार असल्याची माहिती स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी केदार पाटील साळुंके यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन कळवले आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष शासनाने विविध उपक्रमाने साजरे करणार असल्याचे जाहीर केले होते त्यात काही मोजके कार्यक्रम सोडले तर संभाजीनगर येथे 200 करोड रुपये खर्चून स्मारक उभारण्याचा प्रस्तावही आजपर्यंत मंजूर झाला नाही.

नांदेड येथे शासनाने उभारलेल्या 16 हुतात्मा स्मारकांचा सर्वांगीण विकास संरक्षण कंपाऊंड, सुशीबीकरण, बसण्याची व्यवस्था, पाणी ,लाईट या सर्व बाबी करून विकास होण्यासाठी स्वातंत्र सैनिक उत्तर अधिकारी यांनी पालकमंत्री जिल्हाधिकारी यांना लेखी देऊन कळवले तर मागील 17 सप्टेंबर या अमृत महोत्सवी कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली असता त्यांनी लगेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना बोलावून तातडीने 16 ही स्मारकांचा विकास करण्याच्या सूचना केल्या

मात्र आज वर्ष पूर्ण होत असतानाही आजपर्यंत कुठलाही विकास करण्यात आलेला नाही त्यामुळे येणाऱ्या 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन स्वतंत्र सैनिकासह स्वतंत्र सैनिकांचे उत्तरअधिकारी हे काळ्याफिती लावून मुक्ती संग्राम दिन साजरा करून शासनाचा निषेध करणार असल्याचे लेखी निवेदन स्वातंत्र्यसैनिक शेषराव पाटील सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा उत्तरअधिकारी केदार पाटील साळुंके यांनी कळविलेले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button