HomeनांदेडDhanegaon scrap shop fire ; धनेगाव येथील भंगार दुकानाला लागलेल्या आगीत लाखो...

Dhanegaon scrap shop fire ; धनेगाव येथील भंगार दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज -NNL

नवीन नांदेड। धनेगाव येथील कमल इंडस्ट्रीज या दुकानाना लागलेल्या आगीत अमर ट्रेडर्सचे व कमल इंड्रस्ट्रीज यांच्या गोडाऊनचे साहित्य जळुन लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री आकरा वाजता घडली असून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने घटनास्थळी नागरीकांनी गर्दी केली होती तात्काळ पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी आगीच्चा रौद्ररूप पाहता मनपा अग्नीशामक दल व औद्योगिक वसाहती, नगरपंचायत नायगाव, आर्धापुर, मुदखेड व खाजगी वाहतूक पंपाच्या पाण्याचा साहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

या आगीत जवळपास लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असुन घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरूव यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला, या प्रकरणी अद्यापही कोणताही गुन्हा दाखल झाला नसुन आगीच्ये धुर दुसऱ्या दिवशीही चालुच होते.

IMG 20240913 WA0021 Dhanegaon scrap shop fire ; धनेगाव येथील भंगार दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज -NNL

प्राप्त माहिती नुसार,नांदेड लगत असलेल्या धनेगाव येथे रात्री आकाराचा सुमारास सतीश शिंदे यांनी अग्निशमन विभागास लातूर फाटा कापूस संशोधन (प्रक्रिया )केंद्र धनेगाव समोर भंगार गोडाऊनला आग लागल्याची माहिती दिली, यावेळी रात्री तिन पथके अग्निशमन अधिकारी के.एस.दासरे यांच्या नेतृत्वाखाली राजेश्वर गायकवाड ,बाबुराव लांडगे, एकनाथ पोवळे, वाहन चालक सुरेश तोटावर तर शनिलेश कांबळे मोहम्मद साजिद,चालक साहेबराव नरवाडे.व अग्निशमन दल मुदखेड ,नायगाव अर्धापूर अग्निशमन दल यांच्या साहाय्याने धनेगाव येथे कापूस प्रक्रिया संशोधन केंद्र समोर असलेल्या जागेमध्ये अमरबिन अहमद चाऊस यांचे अमर ट्रेडर्स व निर उस्मान अली कमल यांचे कमल इंडस्ट्रीजया दुकानांना रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती.

या आगीमध्ये अमरबिन अहमद चाऊस यांचे अमर ट्रेडर्सचे 40 ते 45 लाखाचे नुकसान झाले यामध्ये भंगार प्लास्टिक व इतर मटेरियल होते, तसेच निर उस्मान अली कमल यांचे कमल इंडस्ट्रीज या गोडाऊन मध्ये भंगार प्लास्टिक मटेरियल अशा वस्तूंना आग लागून 30 ते 32 लाखाचे नुकसान झाले ,सदरील कशी लागली याची माहिती समजू शकली नसल्याचे अग्नीशामक दल अधिकारी दासरे यांनी सांगितले.

घटनास्थळी ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने भेट देऊन आग विझविण्यासाठी लागणारा कालावधी पाहता तात्काळ नांदेड मनपा अग्नीशामक दल यासह औधोगिक वसाहत, नायगाव, मुदखेड, यांच्या ,नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे तीन अग्निशमन वाहने तसेच औद्योगिक वसाहतीचे एक अग्निशमन,अर्धापूर नगर परिषदेचे एक अग्निशमन वाहन, मुदखेड नगर परिषदचे अग्निशमन वाहन, नायगाव नगरपरिषदचे एक अग्निशमन वाहन यांनी सकाळी दहा वाजेपर्यंत पाणी मारून आग विझवण्या साठी शर्तीचे प्रयत्न केले आहे, या प्रकरणी अघापही गुन्हा दाखल करण्यात आला नसुन स्टेशन डायरी येथे आग लागल्याची नोंद करण्यात आली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments