HomeनांदेडSatish Deshmukh : काँग्रेसने सतीश देशमुख यांना उमेदवारी द्यावी,निवडून आम्ही देऊ -NNL

Satish Deshmukh : काँग्रेसने सतीश देशमुख यांना उमेदवारी द्यावी,निवडून आम्ही देऊ -NNL

नांदेड| होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मधून काँग्रेसने सतीश देशमुख तरोडेकर यांना उमेदवारी द्यावी, निवडून आम्ही देऊ असा विश्वास वाढदिसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या समर्थकांनी व्यक्त केला.

माजी उपमहापौर तथा काँग्रेसचे नांदेड उत्तरचे विधानसभा निवडणुकीतील प्रबळ दावेदार श्री सतीश पुंडलिकराव देशमुख तरोडेकर यांचा वाढदिवस नांदेड येथे त्यांच्या मित्र परिवाराने मोठ्या स्वरुपात साजरा केला. शुभेच्छा देण्यासाठी नांदेड उत्तर मधील कार्यकर्ते, ग्रामीण व शहरी भागातील शुभ चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर नांदेड उत्तर मध्ये सतीश देशमुख यांनी परिवर्तन संकल्प यात्रा काढली असून विकास व जन सामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नांदेड उत्तर मधून काँग्रेस कडे सतीश देशमुख तरोडेकर यांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसने सतीश देशमुख यांना उमेदवारी द्यावी,निवडून आम्ही देऊ असा विश्वास समर्थकांनी यावेळी व्यक्त केला.

वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मित्र परिवाराने सतीश भाऊ नांदेड उत्तर परिवर्तन संकल्प गीत प्रदर्शित केले. त्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. नियोजनबद्ध विकास,महिला सुरक्षा,शेतीमालाला हमीभाव,आरोग्याच्या पायाभूत सुविधा,नांदेडमध्ये रोजगार निर्मिती हे प्रमुख मुद्दे घेऊन संकल्प यात्रेच्या माध्यमातून जनतेला ते भेटत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments