नवीन नांदेडl सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील पुणेगांवकर यांच्या वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी जिजाऊ ब्लड सेंटर नांदेड यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले,यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील पदाधिकारी ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

१२ सप्टेंबर रोजी सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व बालाजी पाटील पुणेगांवकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनेक गावातील सरपंच,चेअरमन, तंटामुक्त अध्यक्ष, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य विविध पक्षाचे पदाधिकारी व शहरातील भाजपा पक्षाचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार सुभाषराव साबणे,नांदेड ग्रामीण भाजपा अध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे,नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती संभाजी पाटील पुयड पुणेगांवकर, श्रीराम पाटील,माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, पांगरी सरपंच हनुमंत पाटील घोगरे, माजी सरपंच बाभुळगाव दता पाटील मोरे, संजय मोरे,बजरंग भेडेकर, माजी पंचायत समिती सदस्य ठोके मामा, ऊधोजक भरत धुत, रवि कोटलवार,भाजपा महानगर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख,बालाजी पाटील हातणीकर, तुकाराम पाटील,सरपंच सटवाजी तारू, माजी सभापती ठोके, सरपंच राहुल ढगे,माजी सभापती मोतीराम पाटील ब्रम्हणवाडेकर, अनिल मोरे, निवृत्ती जिकंलवाड, ब्रिजलाल ऊगवे, बिपीन गादेवार, यशवंत पाटील, काळबा पाटील मस्के, गुंडेगाव सरपंच बबनराव हंबरडे, उपसरपंच सदानंद कुरे, चिमणाजी पाटील कदम,यांच्यासह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


यावेळी जिजाई रक्तगट सेंटर नांदेड यांच्या वतीने रक्त संकलन,गंगाधर पवार,शिवानी माजळकर,आरती शिरगिरे, यांनी रक्त संकलन केले. यावेळी सामाजिक राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या.


