Hadgaon-Himayatnagar assembly elections : हदगांव-हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाजाचा स्वतंत्र उमेदवार उभा रहाणार -NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार| हदगांव-हिमायत्तनगर विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर दि ३१ आगस्ट रोजी हिमायत्तनगर येथे आदिवासी समाज बांधवाची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या हदगाव व हिमायतनगर विधानसभा निवडणुकी आदिवासी समाज बांधव उच्चं शिक्षित व सक्षम असा एक आदिवासी उमेदवार उभा करणार आहे. यावर एकमताने बैठकीत निर्णय घेण्यात आला असून, यासही तालुक्यात आदिवासी समाज बांधव तयारीला लागले आहेत. आदिवासी समाजाने घेतलेल्या हा एकजुटीचा निर्णय मात्र अनेक भावी आमदाराचे स्वप्न भंग करणारा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

हदगाव हिमायत्तनगर तालुक्यात आदिवासी समाजाचे एकगठ्ठा मतदान हे निर्णायक आहे. आदिवासी समाज ज्यांच्या पाठीशी तो उमेदवार विजयी असे समीकरण आत्तापर्यंत अमलात आले असल्याचे बोलले जात आहे. असे असताना देखील निवडणून आलेला उमेदवार हा आदिवासी समाजाच्या प्रमुख गरजांकडे दुर्लक्ष करत आलेला आहे. एव्हडेच नाहीतर कुठल्याही पक्षाने आदिवासी समाजाला उमेदवारी तर सोडूनच द्या पण आदिवासी समाजाचा साधा विचार सुद्धा केला तयार नाही. हदगाव व हिमायत्तनगर विधानसभेतआदिवासी समाजाचे मतदान जवळपास ५० हजारांच्या घरात असून, या समाजाचा फक्त मतदाना पुरता वापर केला जात असल्याचे चित्र प्रत्येक निवडणूकिला दिसून आले आहे.

हदगाव – हिमायतनगर विधानसभा क्षेत्रात नेते मंडळीचा भ्रम आहे कि हा आदिवासी समाज आमच्या दावणीला बांधलेला आहे. त्यामुळे आदिवासी समाजाचा जास्त विचार करायला कोणत्याही पक्षाकडे या नेतेमंडळीकडे वेळ नाही. तसेच मतदानासाठी आदिवासी भागात येऊन बेंबीच्या देठापासून ओरडत आश्वासनाची खैरात दिली जाते. निवडणूक झाली या आश्वासनाचा त्यांना विसर पडतो असे आतापर्यंत घडत आले आहे. या सर्व गीष्टी लक्षात घेता हदगाव हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी ठरवले कि आता आम्ही आमच्या समाजाचा उच्चशिक्षित व्यक्तीला विधानसभेच्या निवडणूकीत उमेदवार म्हणून उतरविणार आणि सर्व ताकतीने निवडणूक लढवून निवडून आणणार असे ठरविले आहे.

आदिवासी समाज बांधवांची बैठक संपन्न होताच भावी आमदार म्हणून स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, आता आपले कसे होईल या विचाराने त्यांचे चेहरे हिरमुसले असल्याचे दिसून येत आहे. हिमायतनगर शहरात संपन्न झालेल्या आदिवासी समाज बांधवांच्या या बैठकीस उपस्थित डॉ. डी. डी. गायकवाड, डॉ. शाम वाकोडे, डॉ. बळीराम भुरके, सत्यव्रत ढोले, पी.डी गायकवाड, डॉ. संजय धुमाळे, डॉ, मारोती वाकोडे, दत्तात्रय वाळके, कांताराव धुमाळे, Advt. रामदास डवरे, डॉ. शिवशंकर बुरकूले, सरपंच श्रीरंग देशमुखे, सरपंच सुनील शिरडे, उपसरपंच संजय माझळकर, सरपंच गंगाराम ढोले, डॉ. सत्यनारायण मुरमुरे, रामदास वाळके, चांदराव वानोळे, यादवराव डवरे, शेषेराव वाळकीकर, डॉ. जनार्धन टारपे, बापूराव डवरे, रामेश्वर ढोले, सखाराम वाकोडे, विशांबर वानोळे, डॉ. खुपसे दगडवाडी, वामन डवरे, आदींसह तालुक्यातील आदिवासी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित बैठक होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button