HomeनांदेडInspection by mla. Mohan Anna Humbarde : आ.मोहन अण्णा हंबर्डे यांची सोनखेड...

Inspection by mla. Mohan Anna Humbarde : आ.मोहन अण्णा हंबर्डे यांची सोनखेड – शेवडी या अतिवृष्टी भागात पाहणी -NNL

लोहा| तालुक्यातील सोनखेड व शेवडी मंडळात अतिवृष्टी झाली .नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहिले. गोदाकाठ च्या भागात शेकडो एकर पीक पाण्याखाली गेले .सोनखेड सर्कल मध्ये आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी पाहणी केली शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत घ्यावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

जिल्ह्यासह लोहा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी सोनखेड सर्कल मधील पळशी, शेवडी शेवडी तांडा, व शिवणी (जा) या गावांना भेटी दिल्या .प्रत्यक्ष बांधावर ,शेतात जाऊन त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची, भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांनाधीर दिला. घाबरू नका, नुकसान भरपाई मिळावी यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे आश्वासित केल.

FB IMG 1725289613938 Inspection by mla. Mohan Anna Humbarde : आ.मोहन अण्णा हंबर्डे यांची सोनखेड - शेवडी या अतिवृष्टी भागात पाहणी -NNL

शेतीतील पिकांचे नुकसान भरपाई शासनाकडून व विमा कंपनी कडून देण्याची हमी त्यांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी सोनखेड सर्कलचे माजी जि प सदस्य श्रीनिवास मोरे, कैलास मोरे,रामदास जमगे,लक्ष्मण चव्हाण,विलास चव्हाण,शेवडीचे उपसरपंच व फकिरसाब शेख,पळशी सरपंच नामदेव कोल्हे,साईनाथ कोल्हे,गोविंदराव शिंदे,परसराम कोल्हे व नवनाथ वरळे उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments