शिवणी/ अप्पारावपेठ, भोजराज देशमुख। परिसरात दि.३१ ऑगस्ट शनिवार रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर सलग तिसऱ्या दिवशी सुध्दा अतिवृष्टी परिस्थीती निर्माण झाली आहे यामुळे या परिसरातील नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
किनवट तालुक्यातील शिवणी सह अप्पारावपेठ परिसरात दि ३१ ऑगस्ट शनिवार रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान सुरू झालेल्या अति मुसळधार पावसाने नाल्याला आलेल्या पुरामुळे पिके वाहून नेली तर अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे.
तर ३१ आगस्ट च्या दिवशी झालेल्या पावसाची नोंद १ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत १०२ मिलीमीटर ची नोंद झाली असून १ सप्टेंबर सकाळी पासून दोन सप्टेंबर सकाळपर्यंत ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकंदरीत दोन दिवसांच्या पावसाच्या पाण्याचा आढावा १७७ मिलीमीटरची नोंद आहे.तर दुसरीकडे दि.२ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या वतीने साजरा होणारा बैल पोळा या सणाला विरजण लागले असून शेतकरी संकटात अडकलेला चित्र पहावयास दिसत आहे.
अगदी तोंडावर आणलेल्या मूग उडीद हे पिके १०० टक्के नुकसान झाले आहे.तर अनेक ठिकाणी सोयाबीन ,कापूस,तूर,या मध्ये सुद्धा पाणी साचले आहे.तर तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी परिस्थीती निर्माण झाली असल्याने सतत तिन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभे खरिप हंगामातील पीक सोयाबीन, कापुस,तुर, उडीद, मूग,मक्का पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात नाल्यांचे पाणी शिरल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
शिवणी अप्पारावपेठ परिसरातील शिवणी, अप्पारावपेठ, दयाल धानोरा, दयाल धानोरा तांडा, गोंडजेवली ,व्यंकटापुर , मलकजाब, मलकजाब तांडा, कंचली,पांगरपहाड,अंदबोरी ई ,चिखली, गोंडेमहागाव, मार्लागुंडा,मानसिंग नाईक तांडा, तोंटबा,झळकवाडी, तल्हारी, या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी महसुल विभागाने नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शिवणी येथील शेत सर्वे नंबर ४६ मधिल अल्पभुधारक शेतकरी गणेश रामलू शिल्लरवाड, विठ्ठल रामलु शिल्लरवाड, नरेश गणेश शिल्लरवाड याच्या शेता लगत नाला असुन या नाल्यावर कृषी विभागाकडून गेल्या आठ वर्षांखाली सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. तो बंधारा फुटुन आज पाच वर्षे झाली गेल्या पाच वर्षांपासून बंधारा फुटल्याने नदिचे पाणी सरळ शेतीतुन जात आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी अनेकदा तहसीलदार यांना निवेदन देऊन सुद्धा या शेतकऱ्याचा काही सुध्दा फायदा झाला नाही दि ३१ ऑगस्ट पासुन सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी परिस्थीती निर्माण झाली ते सर्व नाल्याचे पाणी शेतातुन वाहत आहे तर शेत सर्व्हे नंबर २९३ व २९४ लक्ष्मण भूमन्ना आडेवार या शेतकऱ्यांच्या शेतातूनच पूर गेल्याने पिकेसह शेती सुद्धा वाहून गेली आहे.करिता महसुल विभागाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात येऊन पाहणी करून तात्काळ बंधारा दुरूस्ती करून शेतीचे झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करित आहेत.
इस्लापुर/शिवणी/अप्पारावपेठ परिसरातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे शेती खरडुन गेली तर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक नागरिकांच्या घरात पाणी गुडघ्या एवढे शिरले त्या नुकसान ग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये व घरात पाणी शिरल्याने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांना केली आहे. अशी माहिती अनुप देशमुख, उपाध्यक्ष, युवक काँग्रेस कमिटी नांदेड, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती इस्लापुर यांनी दिली.