हिमायतनगर,अनिल मादसवार| पैनगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या डोल्हारी गाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारच्या रात्रीपासून 15 वानर झाडावर अडकून पडले असून, त्यांना वाचविण्यासाठी वनविभागाला रेस्क्यू ऑपरेशन राबवावे लागणार आहे.
गेल्या इन दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. रविवार च्या रात्रीपासून पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून, यामुळे नदी काठावरील परिसरातील शेत शिवारात पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान रविवारी सायंकाळी काही वानर डोल्हारी परिसरातील शेतीच्या बाभळीच्या झाडावर चढली होती. दरम्यान झाडाखाली पुराचे पाणी आल्याने पाणीच पाणी येऊन बाभळीच्या झाडावर दहा ते पंधरा वानरांची टोळी अडकून पडली आहे. वानर झाडावर अडकून असल्याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला दिली मात्र सोमवारी रात्रीपर्यंत वन विभागाचे एकही अधिकारी वानरांना पुराच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी आले नाही. त्यामुळे डोलारी परिसरातील नागरिकांत वनविभागाच्या दुर्लक्षित कारभाराबाबत नानाजी व्यक्त केली जात आहे.
सध्याच्या पुरस्थितीला लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी आपत्कालीन पथकाच्या माध्यमातून पूरस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी याना मुख्यालयी राहून देखरेखीची जबाबदारी निश्चित केली आहे. मात्र हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठी असलेल्या डोल्हारी या ठिकाणी अडकून असलेल्या वानरांना वाचविण्यासाठी कुणीही आले नाही. याबाबाची माहिती गावकर्यांनी वनविभागाला दिली असल्याचे सांगितले मात्र वनविभाग किंवा आपत्कालीन पथकाचे कोणीही इकडे फिरकले नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पैनगंगा नदीच्या पुराचे पाणी या भागाकडे आल्यानंतर वानर झाडावर चढली मात्र पाणी काही कमी होत नसल्यामुळे वाहणाऱ्यांना झाडावरच कालपासून मुक्काम करावा लागला आहे. जवळपास ३० तास होत आले असताना देखील यांना वाचविण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नसल्याची खंत वन्यप्रेमी नागरिकांनी पत्रकारांशी बोलून दाखवली आहे.